esakal | सावधान! कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur corona update

सावधान! कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट (coronavirus) ओसरल्यानंतर जिल्ह्यात आता तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत. मागील तीन दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्णसंख्येत (nagpur corona cases) हळूहळू वाढ होत आहे. सोमवारी (ता.६) नव्याने १२ जणांना कोरोनाची लागण झाली, तर अवघ्या तिघांनी कोरोनावर मात केली. विशेष असे की, यातील अनेक जण लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले रुग्ण आहेत. यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली.

हेही वाचा: पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू

सोमवारी शहरात २ हजार ५१९ कोरोना चाचण्या झाल्या आहेत, तर ग्रामीण भागात २६८ चाचण्या झाल्या. यात १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात शहरातून ७ तर ग्रामीण भागातून १ व जिल्ह्याबाहेरील ४ कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत असून कालपर्यंत ४७ रुग्णसंख्या होती. मात्र, ही संख्या ५६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९३ हजार ७२ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. यातील ४ लाख ८२ हजार ८९७ जणांनी कोरोनावर मात केली. तर १० हजार ११९ जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. सद्या शहरातील ४७ तर ग्रामीणचे ५ व जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

  • ३ सप्टेंबर - ४ कोरोनाबाधित

  • ४ सप्टेंबर - ७ कोरोनाबाधित

  • ५ सप्टेंबर - १० कोरोनाबाधित

  • ६ सप्टेंबर - १२ कोरोनाबाधित

loading image
go to top