esakal | खुशखबर! नागपूर जिल्ह्यात १३७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन सिलेंडर
खुशखबर! नागपूर जिल्ह्यात १३७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात आज १३७.५८ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. यामधे बाहेरून ७८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.

हेही वाचा: पेटंट सादर करण्यात विदर्भातील विद्यापीठ पिछाडीवर, 'अभिमत' मात्र आघाडीवर

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांवर उपचार करणाऱ्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयांना दररोज सरासरी १४८ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. विभागातील इतर जिल्ह्यांना ५० टन ऑक्सिजन यानुसार विभागासाठी ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील इस्पात उद्योगातून जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

अन्न व औषधी प्रशासनाचे नोडल अधिकारी सतीश चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील व विभागातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यासाठी आज ७८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला असून हा पुरवठा आदित्य पारक्ष इयर यांच्याकडून ४२ मेट्रिक टन तर रेणुका येथून ३६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाले आहे.

ऑक्सिजनसाठी १५ टँकर -

नागपूर विभाग व जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भिलाई राहुल केला येथून ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी १५ टॅंकरचा वापर करण्यात येत आहे. टॅक्स एअरमार्फत बाहेरील राज्यातून टँकरद्वारा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.