Nagpur Tigers: नागपूरचे वाघोबा होणार गुजरातवासी... अंबानींच्या रेस्क्यू सेंटरमध्ये घेणार आसरा, स्थानिकांनी केला कडाडून विरोध

15 Tigers Relocated from Nagpur to Gujarat: वाघाला नेण्यास काही सामाजिक संघटनानी विरोध केला असला तरी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हिरवी झेंडी दिली आहे.
Tigers at Gorewada Zoo (file photo)
Tigers at Gorewada Zoo (file photo)esakal
Updated on

नागपूर: गुजरातमधील जामनगर येथील रिलायंसच्या ‘ग्रीन्स झुऑलॉजिकल रेस्क्यू ॲण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’मध्ये गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये १५ वाघ जाणार आहेत. वाघांना नेण्यासाठी जामनगर येथील चमू चार ट्रक घेऊन नागपुरात दाखल झाली आहेत. पुढील तीन दिवसात १५ वाघ गुजरातला रवाना होण्याची शक्यता आहे.

वाघाला नेण्यास काही सामाजिक संघटनानी विरोध केला असला तरी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हिरवी झेंडी दिली आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा वाघांची संख्या अधिक झालेली आहे. १५ वाघ ठेवण्याची क्षमता असताना आता २९ वाघ सेंटरमध्ये झालेले आहेत. यातील अनेक वाघ हे मानव-वन्यजीव संघर्षातील आहेत.

चार वाघांवर उपचार केले जात आहे. रेस्क्यू सेंटरमधील वाघांना हलविण्याबद्दल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडून प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पत्र पाठविले होते. त्यानुसार दोन वाघ पूर्वीच राजस्थानमध्ये रवाना झालेले आहेत.

गोरेवाडयातील १५ वाघांना जाऊ देणार नाही. महाराष्ट्रातील अनेक जंगलात वाघ नाही तेथे वाघांचे स्थलांतरण करावे. अनेक संग्रहालयात वाघ नाहीत, तेथे पाठविण्यात यावेत.

- नारायण बागडे, अध्यक्ष, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा

Tigers at Gorewada Zoo (file photo)
दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाच्या दर्शनाने पाटण तालुक्यात खळबळ; नागरिकांत घबराट, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी

छत्तीसगडमध्येही वाघ जाणार असले तरी अद्यापही तेथील सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या नाहीत. गुजरातमधील ग्रीन झुऑॅलॉजीकल सेंटरच्या चमूंनी प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे वाघांची मागणी केली होती. त्यानुसार वाघांना हलविण्यासाठी प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला. त्यानुसार आता चमू दाखल झालेली आहे.

Tigers at Gorewada Zoo (file photo)
Nagpur News : जनताच ‘मविआ’ला जोडे मारणार, माफी मागूनही आघाडीकडून राजकारण - मुख्यमंत्री शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com