अल्पवयीन प्रेयसीचे प्रियकरासोबत पलायन, असा उघडकीस आला प्रकार... 

15-year-old girl was abducted by her boyfriend in Amravati
15-year-old girl was abducted by her boyfriend in Amravati
Updated on

नागपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींशी मैत्री करून त्यांचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी अश्‍लील चाळे करायचे. दरम्यान त्याचे व्हिडिओ शूट करून तिला बदनामीची धमकी द्यायची, असेही प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना अमरावती येथील युवकाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढल्याची घटना उघडकीस आली. एवढ्यावरच तो युवक थांबला नाही तर त्याने पुढील प्रकारही केला. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमामवाडा परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय प्रेयसीला अमरावती येथे राहणाऱ्या प्रियकराने फूस लावून पळवून नेले. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवक शुभम वानखेडे ( वय 20) विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. अमरावतीच्या कळमापूर मोर्शी निवासी शुभमने त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. 

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्याने विविध स्वप्न दाखविले. पळून जाण्यासाठी तिला विविध प्रकारचे आमिष दाखवून पळून जाण्यासाठी तयार केले. ठरल्यानुसार घरी कुणाला काही न सांगता ती सोमवारी दुपारी 12.30 वाजता ठरलेल्या ठिकाणी आली. इकडे शुभनेही सर्व तयारी करून ठेवली होती. ती येताच शुभमने तिच्यासह शहराबाहेर धूम ठोकली. 

बराच वेळ होऊनही मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. तिच्या मित्र-मैत्रिणींकडे विचारणा करणे सुरू केले. परंतु कुठेही ती नसल्याचे समजल्यानंतर पालकांना धक्‍काच बसला. कुटुंबीयांनी सर्व नातेवाईकांकडे विचारपूस केली. परंतु काही फायदा झाला नाही. दरम्यान, तिच्या मैत्रिणींकडून माहिती मिळाली की, शुभमने तिला फूस लावून पळवून नेले आहे. घटनेची पोलिसांत तक्रार करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. 

गेल्या आठवड्यात होता प्लान 

विविध स्वप्ने दाखवून अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेल्या शुभमने गेल्या आठवड्यातच पळून जाण्याचा प्लॅन तयार केला होता. परंतु, कौटुंबिक कार्यक्रमामुळे त्यांना हा प्लान रद्द करावा लागला होता. नवीन प्लाननुसार सोमवारी पळून जाऊन सोबत राहण्याचा बेत त्यांनी आखला. ठरल्यानुसार ते दोघेही पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

शारीरिक आकर्षणापोटी मुलींचा आत्मघात 

सदर अल्पवयीन मुलीचे वय 15 वर्षे असून ती शालेय विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जाते. खेळणे आणि अभ्यास या दोनच गोष्टीत गुंतण्याच्या वयात मुली प्रेमप्रकरणात ओढल्या जातात. कमी वयात निर्माण झालेल्या शारीरिक आकर्षणापोटी चुकीचे निर्णय घेऊन आत्मघात करतात. वाढते मोबाईलचे व्यसन आणि सोशल मीडियाचा वापरही त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.  


संपादित : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com