esakal | नागपूर विभागात 18 संशयित कोरोनाग्रस्तांवर डॉक्‍टरांची नजर, मास्कच्या विक्रीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

करोना विषाणू बाधित भागातून आलेल्या 401 प्रवाशांपैकी 318 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. विदेशातून नागपूर, चंद्रपूर, वर्धा शहरात दाखल झालेल्या 39 जणांवर आरोग्य सेवेच्या नागपूर विभागातील डॉक्‍टरांची नजर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 39 संशायित करोना रुग्णांपैकी 21 जणांवर 14 दिवस डॉक्‍टरांची पाळत होती. सद्या 18 करोना संशयित व्यक्तींवर आरोग्य विभागातील डॉक्‍टरांकडून पाठपुरावा सुरू आहे. 

नागपूर विभागात 18 संशयित कोरोनाग्रस्तांवर डॉक्‍टरांची नजर, मास्कच्या विक्रीत वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : करोना विषाणूची दहशत पसरल्याने अनेकजण मास्क घालत आहेत. रस्त्यावर, रुग्णालयात हे चित्र दिसत आहे. मास्क कोणी घालायचे याबाबत गैरसमज आहेत. करोनाचा संशयीत रुग्ण असेल त्याने मास्क घालायचा आहे. जे डॉक्‍टर उपचार करतात त्यांनी मास्क घालायचा आहे. कोणीही मास्क घालू नये. मास्क घालताना डोळ्यावरचा चष्मा, खिशातील पेन, हातावरचे घड्याळ येथेही विषाणू असू शकतो. घरी जाताच या सर्व वस्तू आपण हाताळतो, यामुळे या मास्कचा काही उपयोग होत नाही, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल म्हणाले. 

करोना विषाणू बाधित भागातून आलेल्या 401 प्रवाशांपैकी 318 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. विदेशातून नागपूर, चंद्रपूर, वर्धा शहरात दाखल झालेल्या 39 जणांवर आरोग्य सेवेच्या नागपूर विभागातील डॉक्‍टरांची नजर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 39 संशायित करोना रुग्णांपैकी 21 जणांवर 14 दिवस डॉक्‍टरांची पाळत होती. सद्या 18 करोना संशयित व्यक्तींवर आरोग्य विभागातील डॉक्‍टरांकडून पाठपुरावा सुरू आहे. 

काय करायला हवे 
-हात साबणाने स्वच्छ धुवावेत. 
-शिंकताना,खोकताना तोंडावर रुमाल धरावा. 
-कच्चे किंवा मांस खाण्यास टाळा. 
-सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. 
-खोकला सर्दी असलेल्या व्यक्तीपासून काळजी घ्यावी 

करोना विषाणूचे देशात रुग्ण आढळल्यामुळे दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात सद्या एकाही रुग्णाची नोंद झाली नसली तरी विदेशातील प्रवासाची पार्श्‍वभूमी असल्याने संशयित रुग्ण दिसून येत आहेत. नागपुरात 3 संशयित रुग्णांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. यामुळे लोकांनी "एन-95' स्क खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वी एकही मास्क विकला जात नव्हता. मात्र अलिकडे प्रत्येक औषधाच्या दूकानातून मास्क खरेदी करण्यासाठी दर दिवसाला चार ते पाच ग्राहक येत असल्याचे सांगण्यात आले.एका मास्कची किमंत 150 रुपये असून तुटवडा जाणवू लागला आहे. उपराजधानीत करोना विषाणूबाबत मेडिकलमध्ये सतर्कता पाळली जात असून मेडिकलमध्ये वॉर्ड क्र. 25 मध्ये 7 खाटा तयार करून ठेवण्यात आल्या आहेत.

वेकोलि अधिका-याचा आफ्रिकन पोपट उडाला... किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
 

दोन व्हेंटिलेटरसह औषधोपचाराची सोय उपलब्ध आहे. एन-95 मास्क विक्रीसंदर्भात मेडिकलमध्ये आलेल्या अनेक विक्रीप्रतिनिधींशी संपर्क साधला असता, नागपूरमध्ये एन-95 स्कच्या विक्रीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. करोना विषाणूच्या दहशतीमुळे मास्कचा वापर जनमानसासोबतच डॉक्‍टरांमध्येही वाढला आहे. एका मास्कची किंमत रुपये आहे. सध्या रोज तीन हजारावर मास्क विकल्या जात असल्याची माहिती आहे. 

मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तेथेच कंट्रोल रुम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात चार खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली आहे. डॉक्‍टरांचा सल्ल्यानेच औषधोपचार करावा. करोना विषाणूला घाबरण्याचे कारण नाही, 97 टक्के नियंत्रणात येणारा आजार आहे. 
-डॉ. संजय जयस्वाल, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर विभाग.