'2024 वर्ष आपलंच'; जुन्या पेन्शन योजनेवरुन आदित्य ठाकरेंचं सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन

नागपूरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी विधानभवनावर धडकले आहेत.
aaditya thackeray
aaditya thackeray

नागपूर- नागपूरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी विधानभवनावर धडकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन योजनेला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. तसेच सरकारवर जोरदार टीका केली.

जगभर जे देश प्रगती करीत आहेत, विकास करत आहेत. त्या देशातील राजकारणी दोन गोष्टी विचार करत असतात. ते शाश्वत विकास करत असतात. ते केवळ रस्ते, इमारती यांचा विकास पाहात नाहीत तर लोकांच्या पुढच्या ५० वर्षांचा विचार करत असतात. त्यांच्या पेन्शनचा विचार करत असतात. पेन्शन असेल की नो टेन्शन असतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

aaditya thackeray
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत RBIचा मोठा इशारा; राज्यांनी आश्वासने...

आज तुम्ही काम करत आहात. देशाची सेवा करत आहात. देश घडवत आहात. पण, निवृत्त झाल्यानंतर आपली काळजी कोण घेणार असा विचार आपण करत आहात. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. २०२४ हे वर्षे आपलं आहे म्हणजे आहे. आपलं म्हणजे आपल्या सर्वांचं आहे. उद्धव साहेबांचं सरकार हे सर्वसामान्यांचं होतं. ते पुन्हा येणार असं ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकच मिशन, जुनी पेन्शनची घोषणा दिली.

aaditya thackeray
Marathi News Live Update: 'मी मुख्यमंत्री असतो तर, तुम्हाला...', उध्दव ठाकरेंचं जुन्या पेन्शन योजनासाठी केलेल्या आंदोलनात मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विराट मोर्चाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, माझे सरकार असते तर तुम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती. आता सुरु केलेला लढा जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. सरकारच्या थापांना बळी पडू नका. सरकारला खाली खेचण्याची आता वेळ आली आहे. गद्दारांचं राजकारण महाराष्ट्रातून घालवण्याची वेळ आली आहे.

खोकेबाज सरकार न्याय देईल असं वाटत नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यांनी देशद्रोही ठरवलं होतं. शिवसेनेचा तुमच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. जे आवश्यक असेल ती मदत आम्ही करणार आहोत. तुमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत आता आपण थांबायचं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com