esakal | मित्रांनो, मी आत्महत्या करीत आहे, मृतदेह घेण्यासाठी लवकर या
sakal

बोलून बातमी शोधा

मित्रांनो, मी आत्महत्या करीत आहे, मृतदेह घेण्यासाठी लवकर या

मित्रांनो, मी आत्महत्या करीत आहे, मृतदेह घेण्यासाठी लवकर या

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : फुटाळ्यावर पोहोचताच अथर्वने सनी, हिमांशू आणि सुजल या तीन मित्रांना फोन केला. त्याने आत्महत्या करीत असून माझा मृतदेह घेण्यासाठी फुटाळ्यावर या, असे सांगितले. ‘मित्रांनो, मी जातोय... पण माझे आईवर खूप प्रेम आहे. त्यामुळे यापुढे तुम्हीच आईकडे लक्ष द्या’ (boy commits suicide) असे सांगितले. त्यांनी ‘प्लिज आत्महत्या करू नकोस... तू आम्हाला आणि आईलाही हवा आहेस’ असे सांगितले. परंतु, त्याने फोन कट केला. (21-year-boy-commits-suicide-by-jumping-into-Futala-lake-with-bike)

प्राप्त माहितीनुसार, अथर्व आनदेवार (वय २१, रा. डॉ. आंबेडकरनगर, सिद्धार्थ चौक, वाडी) याचे वडील खाजगी कंपनीत काम करतात. तर आई गृहिणी आहे. सोमवारी सकाळी क्षुल्लक कारणावरून कुटुंबीयांसोबत वाद झाला. त्यामुळे तो रागात होता. दुपारी १२ च्या सुमारास तो दुचाकीने फुटाळा तलावावर पोहोचला. तेथून त्याने मित्रांना फोन करून आत्महत्या करीत असल्याचे सांगून त्वरित फुटाळा तलावावर येण्यास सांगितले.

हेही वाचा: दीड लाखाच्या बदल्यात जीव! गोंदियात ॲसिड टाकून तरुणाचा खून

अथर्व दुचाकीने वायुसेनेकडे जाणाऱ्या मार्गावर पोहोचला. या भागात तलावाचा सपाट भाग आहे. तसेच दुपारी या भागात वर्दळ कमी असते. त्यामुळे अथर्वने दुचाकी भरधाव तलावाच्या दिशेने पळवली आणि थेट तलावात उडवली. त्याला पोहता येत नसल्याने तसेच दुचाकी अंगावर पडल्याने तो पाण्यात गाडीसह बुडाला. ही घटना काही प्रत्यक्षदर्शीसाठी पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

काहींनी लगेच आरडाओरड करीत वाचविण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमुळे फुटाळ्यावर मोठी गर्दी जमा झाली. यादरम्यान त्याचे तिन्ही मित्र फुटाळ्यावर पोहोचले. अथर्व बुडत असल्याचे त्यांना दिसले. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. पोलिस आणि बचाव पथकाला सूचना देण्यात आली. काही बचाव पथकाने नावेच्या साहाय्याने मदत कार्य सुरू केले. काही वेळानंतर पथकाला अथर्वची दुचाकी तलावात सापडली. मात्र, अथर्वचा मृतदेह गवसत नव्हता. दुपारी ४ च्या सुमारास अथर्वचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

हेही वाचा: चार दिवसांचे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण; हल्लेखोर वाघ जेरबंद

आईने फोडला हंबरडा

मित्रांनी अथर्वच्या बाबाला फोन करून माहिती दिली. आई-बाबा आणि अन्य नातेवाईक फुटाळ्यावर पोहोचले. तलावातून अथर्वचा मृतदेह बाहेर काढताच आईने मोठ्याने हंबरडा फोडला. त्याचे वडील पश्‍चातापाच्या अग्नीत जळत होते. तरुण मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर परिसरात व मित्र परिवारातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

(21-year-boy-commits-suicide-by-jumping-into-Futala-lake-with-bike)

loading image