खुशखबर! २४०० बेड्स उपलब्ध होणार; हॉटेल्स, हज हाऊससह सेवाभावी संस्थांचा पुढाकार

beds
bedse sakal

नागपूर : रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेवर कधी नव्हे एवढा भार पडला आहे. रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य विमा योजना, महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स यांनी पुढाकार घेतला असून लवकरच शहरात जवळपास २४०० नवा खाटा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.

beds
हृदयद्रावक! उपचाराअभावी कोरोनाग्रस्तानं प्रवासी निवाऱ्यात तडफडून सोडले प्राण; ब्रह्मपुरीतील घटना

गेल्या महिन्याभरापासून शहरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यासह शहरातील विविध खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयांद्वारे खाटा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातूनच खासगी रुग्णालयांनी हॉटेल्सशी टायअप केले आहे. त्यातून शहरातील २३ हॉटेल्समध्ये असलेल्या ४०५ रुममध्ये आता ६७२ नवे बेड रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये शहरातील मोठ्या हॉटेल्सचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील आयुर्वेदिक रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेने सुतीकागृहात खाटांची व्यवस्था केली आहे. याशिवाय विविध स्वयंसेवी संस्थांनी रुग्णांचे उपचार व्हावे यासाठी काही ठिकाणी खाटांची सोय करून ठेवली आहे. त्यामुळे येत्या दिवसात शहरात २४०८ खाटांची भर पडणार आहे.

beds
आता चक्क कार्यालयासमोरच होणार कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आढळल्यास गुन्हा दाखल

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून सुयोग हॉस्पिटल ग्रुपतर्फे आदी हॉटेलमध्ये ६५ खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. राऊत यांनी पुढाकार घेत केवळ २४ तासांत त्यासाठी आवश्यक परवानगी मिळवून दिली. सुयोग हॉस्पिटलचे डॉ. गिरीश मोटवाणी यांनी कोरोना महामारीच्या संकटात त्यांच्या हॉस्पिटलमार्फत सेवा देण्याची तयारी दर्शवीत हॉटेलमध्ये रुग्णालय सुरू करण्याची परवानगी देण्यासंदर्भात पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार डॉ. राऊत यांनी मनपा आयुक्तांना तत्काळ पाहणी करून मंजुरी देण्याचे आदेश दिले. पुढे खाटांची संख्या २०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.

  • राज्य कर्मचारी विमा योजना -२००

  • विभागीय क्रीडा संकुल - ६००

  • हॉटेल्स - ६२७

  • स्वयंसेवी संस्था व महापालिका -२४०

  • विवेका हॉस्पिटल - २००

  • पक्वासा, आयुर्वेदिक - ३१६

  • विझार कंपनी (महापालिका) - (जीएससी, आयजीएससीएच, खासगी)-१२५

  • हज हाऊस - १००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com