Dengue
Denguee sakal

धोका वाढतोय! आठ दिवसांत २५० जणांना डेंगीचा विळखा, ६ जणांचा मृत्यू

नागपूर : कोरोनानंतर शहरासह जिल्ह्यावर डेंगीचे संकट (nagpur dengue update) कोसळले आहे. अवघ्या आठवडाभरात जिल्ह्यात डेंगीच्या अडीचशेवर रुग्णांची (nagpur dengue patients) नोंद झाली आहे. डेंगीचा उद्रेक सातत्याने सुरू आहे. स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेल्या उपराजधानीत महापालिकेच्या (nagpur municipal corporation) आरोग्य विभागाने केवळ १८९७ जणांच्या रक्ताची तपासणी केली असता, ३५० जण डेंगीग्रस्त असल्याचे आढळून आले. विशेष असे की, अवघ्या सात दिवसात ११७ जणांना डेंगीने विळख्यात घेतले. जिल्ह्यात ६ मृत्यूंची नोंद (nagpur dengue death toll) झाली आहे.

Dengue
पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

नागपूर शहराप्रमाणे नागपूरच्या ग्रामीण भागातही डेंगी तापाचे २६३ रुग्ण आढळले आहेत. यातील १२८ डेंगीग्रस्त अवघ्या १० दिवसातील आहेत. विशेष असे की, मेडिकलमध्ये मागील १० दिवसांमध्ये २३६ डेंगीग्रस्तांची नोंद झाली असून सध्या ८५ डेंगीग्रस्त मेडिकलच्या दोन वॉर्डमध्ये दाखल आहेत. डेंगीच्या रुग्णांमुळे येथील दोन वॉर्ड हाऊसफुल्ल झाले आहेत. यामुळे डेंगीच्या रुग्णांसाठी बुधवार (ता.४ ) पासून नवीन वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. मेयोचीही हीच स्थिती आहे. मेयो रुग्णालयात आतापर्यंत डेंगीचे ९९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३५ रुग्ण दाखल आहेत. मेयो मध्ये एका संशयित डेंगीसदृश्य रुग्णाचा मृत्यू झाला. तर मेडिकलमध्येही एका डेंगीच्या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र या दोन्ही मृत्यूचे विश्लेषण आरोग्य विभागातील समितीने केले नसल्यामुळे या मृत्यूची अद्याप नोंद झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

पूर्व विदर्भात ८६९, ९ मृत्यू -

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये आठवडाभरात सुमारे ३५५ डेंगीग्रस्त आढळून आले आहेत. यातील २४२ डेंगीग्रस्त हे नागपूर जिल्हातील आहेत. तर या सहा जिल्ह्यांमध्ये मागील सात महिन्यात सुमारे ८६९ डेंगीचे रुग्ण आढळले. यात ९ मृत्यू असून नागपूर जिल्हा टॉपवर असून ६१३ डेंगीग्रस्तापैकी ६ मृत्यू आहेत. दोन मृत्यूची नोंद व्हायची आहे.

  • नागपूर -६१३

  • वर्धा -१२०

  • भंडारा - १३

  • गोंदिया - ८

  • चंद्रपूर - ११४

  • गडचिरोली- १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com