esakal | ‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो‘ म्हणत केली पैशांची मागणी..नकार मिळताच केले हे धक्कादायक कृत्य..वाचून तुम्हालाही बसेल धक्का   
sakal

बोलून बातमी शोधा

3 people steal luxury car of a man in Nagpur

गंगाराम रामदास पोलोलू (६१) रा. नाईकनगर, मानेवाडा रोड, असे हनुमानभक्ताचे नाव आहे. गुरुवारी ते आपल्या एसक्रॉस कारने डुंडा मारोती देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते.

‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो‘ म्हणत केली पैशांची मागणी..नकार मिळताच केले हे धक्कादायक कृत्य..वाचून तुम्हालाही बसेल धक्का   

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर: नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी हत्या तर कधी लूट अशा घटनांनी नागपूर अक्षरशः हादरून गेले आहे. यात भर म्हणून नागपूरच्या वेळाहरी गात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हनुमानाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून काही गुंडांनी धक्कादायक कृत्य केले आहे. 

गंगाराम रामदास पोलोलू (६१) रा. नाईकनगर, मानेवाडा रोड, असे हनुमानभक्ताचे नाव आहे. गुरुवारी ते आपल्या एसक्रॉस कारने डुंडा मारोती देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून दुपारी ते परतीच्या प्रवासाली निघाले. बेलतरोडी हद्यीत वेळाहरी गावासमोरील सर्विस रोडवरील बसस्टॉपपासून ५०० मीटर समोर, केंद्रीय प्रोव्हिजन शाळेजवळील नाल्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. मात्र तिथेच त्यांच्यासोबत धक्कदायक प्रकार घडला. 

अधिक माहितीसाठी - ...आणि बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली, भावावर काळाचा घाला; अपघातात अकाळी मृत्यू

पैशांची केली मागणी 

परत गाडीत बसत असतांना ३० ते ३५ वर्ष वयोगटातील तीन अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून आले. त्यांनी आपले वाहन कारसमोर आडवे केले. ‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो‘ या शब्दात पैशांची मागणी केली. त्यांच्याकडे दुर्लक्षकरीत पोलालू कारमध्ये बसू लागले. त्याचवेळी आरोपीपैकी एकाने पोलोलू यांच्यावर चाकू उगारला. धाक दाखवित त्यांना ढकलून कार घेऊन पळून गेले. 

पोलिसांनी सुरु केला शोध 

तीन लुटारूंनी चाकूच्या धाकावर त्यांची ११ लाखांची लक्झरी कार पळवून नेली. बेलतरोडी पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवित सहा तासांतच कुख्यात सोनू खानसह तिन्ही लुटारूंच्या मुसक्या आवळल्या. कारमध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच चिल्लर आणि नोट असे दीड हजार रुपये होते. पोलोलू हे कसेबसे परतल्यानंतर बेलतरोडी ठाणे गाठून तक्रर दिली. त्या आधारे पोलिसांनी दुखापत व जबरी चोरीता गुन्हा नोंदवित आरोपींचा शोध सुरू केला.

क्लिक करा - सावधान! विदर्भातील पावसाबाबत हवामान विभागाने दिले हे गंभीर संकेत.. वाचा सविस्तर

आरोपी सराईत गुन्हेगार

त्वरीत वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीच्या शोधार्थ पाठविण्यात आली. पोलालू यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. खबऱ्यांना सक्रीय करण्यासह नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. एक एक धागा जोडत पोलिसांनी तिन्ही आरोपिंच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही आरोपी पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आसून त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सोनू खान महबूब खान (३२) रा. यासिन प्लॉट, उमरेड रोड, मोठा ताजबाग, शेख हमिद शेख बब्बू (३८) रा. ताज अम्मा कॉलनी, बडा सरायजवळ, मोठा ताजबाग, सचिन नारायणराव पारधी (३४) रा. प्रभातनगर, नरसाळा अशी आरोपींची नवे आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top