esakal | टोली दगडफेक प्रकरण : परिसरात तणावपूर्ण शांतता! ३० आरोपींना अटक, तर ३ महिला कर्मचारी

बोलून बातमी शोधा

toli stone pelting
टोली दगडफेक प्रकरण : परिसरात तणावपूर्ण शांतता! ३० आरोपींना अटक, तर ३ महिला कर्मचारी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अवैध धंद्यासाठी नावाजलेल्या रामटेकेनगर टोली वस्तीत पोलिसांच्या वाहनावर तुफान दगडफेक (stone pelting on police) झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना धरपकड करण्याचा सपाटा सुरू केला. पोलिसांनी ३० आरोपींना अटक केली. यामध्ये अल्पवयीन मुले आणि सहा महिलांचाही समावेश आहे. नागरिकांच्या हल्ल्यात तीन महिला होमगार्ड जखमी झाल्या आहेत. आज मंगळवारी टोलीत अजनी पोलिसांचा (ajni police) मोठा ताफा तैनात होता तर वस्तीत तणावपूर्ण शांतता होती. (30 accused arrested in toli stone pelting on police in nagpur)

हेही वाचा: ऑक्सिजनची पातळी ७१ वर आली, पण न घाबरता रोहित शर्माने केली कोरोनावर मात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी हद्दीतील टोली परिसरात कुख्यात तडीपार गुंड संदीप नाडे हा श्रावण नाडे, सचिन नाडे, नितीन नाडे, चिन्नू ऊर्फ काजू नाडे, गरीबदास नाडे या साथीदारांच्या मदतीने एका घरात जुगार अड्डा भरवितो. या अड्ड्याबाबत अजनी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक ठाकूर हे आपल्या ताफ्यासह सोमवारी सायंकाळी कारवाईसाठी पोहचले. जुगार अड्ड्यावर कारवाई करीत आरोपींना पकडले. आरोपींना पोलिस वाहनात बसवित असतानाच एका टोळीने पोलिसांच्या वाहनावर तुफान दगडफेक करीत हल्ला चढविला. दरम्यान, 'पोलिसांनी महिला व मुलांना मारहाण केल्याची अफवा पसरली', त्यामुळे काही आरोपींनी मोठ्या संख्येने गैरकायद्याची मंडळी गोळा करुन पोलिसांवर तुफान दगडफेक केली. दरम्यान, तीन महिला होमगार्डला मारहाण केली. सोमवारी रात्रीला टोळी वसाहतीला पोलिसांचा मोठा ताफा तैनात असल्याने वस्तीला छावणीचे स्वरुप आले होते. अजनी पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.

नागपूर अन् विदर्भात आज काय महत्वाच्या घटना घडल्या माहिती आहेत का? वाचण्यासाठी इथं क्लिक करा

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

आरोपींचा ६ पर्यंत पीसीआर -

अजनी पोलिसांनी एकूण ३० आरोपींना अटक केली. यामध्ये २२ पुरुष, २ अल्पवयीन व ६ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यातील १० आरोपींना न्यायालयाने ६ मे शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात देण्यात आले. तर उर्वरित सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

यांना केली अटक -

अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुणाल संजय लखोटे, निखिल गजाजन टिपले, सोनू राजेंद्र पाटील, नयन वासुदेव हावरे, अल्ताफ प्रकाश लोंढे, अनिकेत रवींद्र पात्रे, प्रवीण माणिक लोंढे, पंकज रामजीवन सरोज, कन्ना कल्लू हातागडे, श्रावण वामन नाडे, आकाश प्रकाश नाडे, धीरज वसंता शेंडे, वतन रतन नाडे, ईश्वर दाजीबा लोंढे, संदीप खुशाल मानकर, दारासिंग जयसिंग लोंढे, वसंता बहादूर लोंढे, सोहन लहू उफाडे, सावन खुशाल मानकर, कैलास अजाबराव हातागडे, प्रताप बकाराम हातागडे, उमेश सुखदेव मानकर आणि इतरांचा समावेश आहे.

४० दारूअड्डे नष्ट -

टोली वस्तीत आज दुपारी पोलिसांचा जवळपास १५० पोलिसांचा घुसला. कारवाईचा धडाका सुरू करीत दारूचे ४० अड्डे नष्ट केले. पोलिसांनी दारूचा सडवा, मोहफूल, प्लास्टिक ड्रम आणि दारूसह १० लाखांचा माल जप्त केला. पोलिसांचा फौजफाटा पाहतात टोळीतील अनेकांनी वस्ती सोडून पळ काढला.