esakal | ऑक्सिजनची पातळी ७१ वर आली, पण इच्छाशक्तीच्या जोरावर जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

बोलून बातमी शोधा

corona updates

ऑक्सिजनची पातळी ७१ वर आली, पण न घाबरता रोहित शर्माने केली कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेने तरुणाईवरच हल्ला चढविला आहे. या भीषण लाटेत आतापर्यंत असंख्य तरुणांना प्राण गमवावे लागले. मात्र, २५ वर्षीय रोहित शर्मा याबाबतीत नशिबवान ठरला. प्रबळ इच्छाशक्ती व नियमित उपचाराच्या बळावर त्याने कोरोनाविरुद्ध संघर्ष (fight with corona) करत ही लढाई जिंकली. मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याने कुटुंबीयांसाठीही तो एकप्रकारे पुनर्जन्माचाच अनुभव होता. (rohit sharma from nagpur overcame corona even oxygen level at 71)

हेही वाचा: वारली चित्रकलेतून साकारले भिंतींवर रामायण; अमरावतीच्या तरुणीचा अनोखा उपक्रम

सरोजनगर, हजारीपहाड परिसरात राहणारा रोहित व्यवसायाने वकील आहे. एका दिवशी त्याचे डोळे दुखू लागले. शिवाय जिभेला चव अन वासही येत नव्हता. वेळ न दवडता चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर लगेच त्याने कुटुंबियांपासून स्वतःला विलगीकरण केले. चार-पाच दिवस घरीच उपचार केले. कुटुंबीय त्याला नियमित औषधांशिवाय, हळदीचे दूध, वाफ, कोमट पाण्याच्या गुळण्या, ताप व ऑक्सिजन चेक करत राहिले. परंतु, अचानक एक दिवस रोहितची तब्येत खालावली. ऑक्सिजन लेव्हल ७१ पर्यंत कमी झाली होती. त्यामुळे तातडीने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉ. अनिल जवाहिरानी व डॉ. शांतीप्रिया यांनी शर्थीचे प्रयत्न करून रोहितला या जीवघेण्या संकटातून बाहेर काढले. त्यावेळी रोहितचा पुनर्जन्म आम्ही अनुभवल्याचे रोहितचे वडिल कैलास शर्मा म्हणाले.

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

घाबरलो परंतु हिंमत नाही सोडली -

रोहितची तब्येत बिघडल्यानंतर आम्ही काही क्षणासाठी घाबरलो होतो. आठ-दहा दिवसांचा काळ आमच्यासाठी खूप भयानक होता. मात्र, आम्ही हिंमत सोडली नव्हती. सुदैवाने रोहितला हॉस्पिटल मिळून त्याच्यावर वेळीच उपचार झाले. मुलानेही उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला. रोहितचा आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती व डॉक्टरांनी योग्य उपचार केल्यामुळेच मुलाचे प्राण वाचल्याचे वडील कैलास शर्मा यांनी सांगितले.

मानसिक स्थिती महत्त्वाची -

कोरोनासारख्या आजारात 'पॅनिक' न होता सकारात्मक राहणे अतिशय आवश्यक आहे. शिवाय रुग्णाची मानसिक स्थितीही तितकीच महत्त्वाची असते. रोहित मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. मी बरा होऊन घरी परत येईल, असा त्याला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकूनच तो घरी परतला, असे कैलास शर्मा म्हणाले.