बारमध्ये गर्दी जमवणे भोवले, मालकाला ३० हजारांचा दंड

paise
paisee sakal

नागपूर : उंटखाना चौकातील ट्रिलियम मॉलमधील (trillium mall nagpur) एजंट जॅक बारमध्ये तरुणाईने कोविड नियम पायदळी तुडविल्याची (corona rules violation) घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बारमध्ये मोठी गर्दी असल्याची माहिती मिळताच धंतोली झोनचे उपद्रव शोध पथक व इमामवाडा पोलिसांनी (imamwad police nagpur) संयुक्तपणे कारवाई केली. बारमालकाला तीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला. (30 thousand fine to bar owner for violation of covid rules)

paise
नवनीत जीऽऽ केंद्र सरकारच्या धोरणामुळे रखडला स्कायवॉक

उंटखाना चौकातील ट्रिलियम मॉल अनेकांच्या आकर्षणाचा केंद्र असून तरुणाई येथे खरेदीसाठी येते. अनेक तरुण शनिवारी एजंट जॅक बारमध्येही दिसून आले. कोविड नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याबाबत महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाला माहिती मिळाली. धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाचे झोन प्रमुख नरहरी बिरकड, दिनेश सहारे, हिरानाथ मालवे, सुशील लांडगे यांनी इमामवाडा पोलिसांसह रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण आढळले.मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे आढळून आले. बारमध्ये १०० पेक्षा जास्त लोक एकाच वेळी होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बार मालकाने कुठलीही व्यवस्था केलेली नसल्याचेही पुढे आले. अखेर बारमालकावर ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तर धोका टळलेला नाही. मनपा प्रशासनाने भविष्यात कोरोनाची लाट येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले. परंतु अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नियमाचे पालन न केल्यास यापेक्षाही कठोर कारवाई करण्यात येईल.
-राधाकृष्णन बी. आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com