esakal | १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता
sakal

बोलून बातमी शोधा

corona dead

१५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पचखेडी (जि. नागपूर) : सध्या जगात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावरील जंगलव्याप्त राजोला गावातही मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. हे मृत्यू केवळ कोरोनाने नाही, तर अन्य आजारांनीही झाले आहेत, हे विशेष.

हेही वाचा: हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भटकंती, प्लेसमेंटचा आकडा अडीच हजाराहून ९९ वर

राजोला हे सुमारे ३ हजार लोकवस्तीचे गाव. येथील १६० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात २१ जण पॉझिटिव्ह आढळले. सुरुवातीला ५० ते ६० वयोगटातील नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांत ३० ते ४० वयोगटातील तरुण तसेच महिलांचा मृत्यू होत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे ३४ नागरिकांचे झालेले मृत्यू निव्वळ कोरोनानेच झाले नाहीत. इतरही आजारांनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने राजोला गावाकडे विशेष लक्ष देऊन कोरोना चाचणीचे शिबिर लावून लसीकरण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: वऱ्हाडींनो लग्नात जाताय? मग लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक

राजोला येथील १६० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २१ बाधित आढळले. कोरोनाने सात-आठ रुग्णांचा मृत्यू झाला असावा. अन्य मृत्यू नेमके कशाने झाले सांगता येत नाही. नागरिकांनी कोरोना चाचणी करावी.
डॉ. निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी
या गावात रोगनिदान शिबिर लावून प्रत्येकाची तपासणी करून गावातच औषधपुरवठा करण्यात यावा. येथील नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे दवाखान्यात जायला मागे-पुढे पाहत आहेत.
-भोजराज ठवकर, माजी जि. प. सदस्य, राजोला सर्कल
loading image