esakal | संघ परिवाराच्या ३६ संघटना नागपुरात, 'या' विषयावर होणार चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

RSS

संघ परिवाराच्या ३६ संघटना नागपुरात, 'या' विषयावर होणार चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये होऊ घातलेली निवडणूक, बंगाल निवडणुकीत झालेला पराभव, खासगीकरण, निर्गुंतवणुकीकरण, इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली दरवाढ या सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी संघ परिवारातील एकूण ३६ संघटनांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक (RSS Meet nagpur) नागपूरमध्ये आयोजित केली आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात शुक्रवारपासून ही बैठक होणार आहे. परिवारातील भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय मजदूर संघ आदी सर्वच संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. बैठकीत सर्वच संघटनांना वर्षभरातील कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असून भविष्यातील रणनीतीसुद्धा निर्धारित करण्यात येणार असल्याचे समजते.

समन्वय बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी, दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. पक्षाच्यावतीने संघटन सचिव बी.एल. संतोष लेखाजोखा सादर करतील.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये संघ व परिवारातील संघटनांची भूमिका यावर मंथन होणार आहे. परिवाराकडून भाजपच्या अपेक्षा जाणून घेण्यात येतील. खासगीकरणाच्या विरोधात विरोधकांच्या आंदोलनाचा प्रभाव हाणून पाडण्यासाठी परिवारातील संघटनांची आक्रमक भूमिका कायम राहावी, याचाही विचार होणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे पेट्रोल, डिझेल तसेच सिलिंडरच्या वाढलेल्या प्रचंड किमतीमुळे भाजपचे कार्यकर्ते व मतदारही नाराज असल्याचे समजते. त्यावर या बैठकीत विशेष चिंतन केले जाणार असल्याचे समजते.

loading image
go to top