वाघ बघायला जायचंय? उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात चला; ५ नव्या पाहुण्यांचं दर्शन   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 cubs of tiger found in Umred-Karhandla Sanctuary in Nagpur

आता या अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळच आज पाच नवे पाहुणे दिसल्याने पर्यटकांना सुखद धक्का बसला. फेरीची (टि.-६) हे पाच बछडे आहेत.

वाघ बघायला जायचंय? उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात चला; ५ नव्या पाहुण्यांचं दर्शन  

वेलतूर (जि. नागपूर) :  माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, राहूल द्रविडसह इतरही जगप्रसिद्ध सेलिब्रेटींनी उमरेड-कऱ्हांडला- पवनी अभयारण्याला भेट दिली. मात्र, पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या जय वाघाच्या मृत्यूनंतर पर्यटकांची संख्या रोडवली होती. आता या अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळच आज पाच नवे पाहुणे दिसल्याने पर्यटकांना सुखद धक्का बसला. फेरीची (टि.-६) हे पाच बछडे आहेत.

हेही वाचा - अमरावतीत कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन 

जयच्या वास्तव्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले हे अभयारण्य काही वर्षापूर्वी व्याघ्रप्रेमींच्या गळ्यातले ताईत बनले होते. हा वाघ गायब झाल्यानंतर येथील पर्यटकसंख्या कमी झाली होती. आता वाघाचे नियमित दर्शन होऊ लागल्याने पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आता फेरी (टी-6) वाघीणीच्या नव्या पाच बछड्याने अभयारण्यात नवा रंग भरला आहे. 

मार्गदर्शक शिवशंकर गेडेकर नेहमीप्रमाणे आजचे पर्यटक राहुल पांडे यांना अभयारण्यत भ्रमंतीवर घेऊन गेले असता परतीच्या प्रवासात रस्त्यालगत काही हालचाली दिसल्या. त्या हालचाली टिपत मार्गक्रमण करताना त्यांना प्रथमतः तिन पिले व वाघीण दिसली. तिच्या दर्शनाने भारावलेल्या पर्यटकांच्या चेहरे प्रफुल्लीत झालेत. तिने तिच्या तिन बछड्यांसह रस्ता पार केला आणि परत माघारी फिरत तिचे मागे पडलेले दोन बछडे एकेक करीत तोंडात पकडून नेले. 

हेही वाचा - बेपत्ता असलेल्या तरुणांचं लोकेशन मिळालं नाल्याजवळ; जाऊन बघताच दिसलं थरकाप उडवणारं दृश्य  

हे अविस्मरणीय दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. हा सुखद धक्का असल्याचे पर्यटकांनी भावना यावेळी व्यक्त केली. वाघिणीसह पाच बछडे प्रथमच दिसले आहेत. या आधी याच वाघीणीला चार बछडे झाले होते, तर त्यापूर्वी दोन, दोन पिल्ल तिने जन्म दिला होता. फेरी ही तिच्या भुऱ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे, हे विशेष. आतापर्यंत या वाघिणीने तेरा बछड्यांना जन्म दिला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ