esakal | पाचशे किलोच्या नंदीने चिमुकल्यांना लावलेय वेड, बनवायला लागले सहा महिने
sakal

बोलून बातमी शोधा

nandi

पाचशे किलोच्या नंदीने चिमुकल्यांना लावलेय वेड, बनवायला लागले सहा महिने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) तान्हा पोळ्यात (tanha pola 2021) जाण्याच्या चिमुकल्यांच्या हौसेवरही निर्बंध आले आहेत. परंतु, काहींनी घरचा लाकडी नंदी सजवून ऑनलाईनद्वारे चिमुकल्यांची तान्हा पोळ्याची हौस भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे सुभेदार ले-आउटमधील रोटकर कुटुंबीयांनी तयार केलेला पाचशे किलोचा लाकडी नंदी आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. हा भव्य नंदी ऑनलाइन बघितल्यानंतर अनेक चिमुकल्यांची उत्सुकता वाढली असून रोटकर यांच्याकडे जाण्यासाठी चिमुकले पालकांकडे हट्ट धरत आहेत.

हेही वाचा: पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू

कोरोनामुळे तान्हा पोळा साजरा करण्यास निर्बंध आहे. त्यामुळे यंदाही चिमुकल्यांच्या उत्साहावर विरजण पडले. परंतु, यातूनही काहींनी मार्ग काढत ऑनलाइनच्या पर्यायाचा वापर सुरू केला. यात नवीन सुभेदार ले-आउटमधील अनुराग रोटकर सागवान लाकडापासून तयार केलेल्या पाचशे किलोचा नंदी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा नंदी तयार करण्याचे काम करण्यात आले. कोरीव कामही करण्यात आल्याने नंदी आकर्षक झाला आहे. नंदीची उंची सहा फूट असून परिसरातील नागरिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे पाचशे किलो वजन असूनही या नंदीला सहज ओढता येत असल्याचे अनुराग रोटकर यांनी सांगितले. नंदीच्या चाकांना बेरिंग असल्याने लहान मुलेही ओढू शकतात, असे ते म्हणाले. सध्या फेसबुक लाईव्हद्वारे हा नंदी दाखविण्यात येत आहे. त्यामुळे ओळखीचे तसेच नातेसंबंधातील नागरिकांसोबतच इतरही नागरिक घरापर्यंत नंदी बघण्यासाठी येत आहेत. यंदा तान्हा पोळा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु ऑनलाइन चांगलाच प्रतिसाद मिळत असून नागरिक कुतूहलाने विचारणा करीत असल्याचे रोटकर म्हणाले. रोटकर यांनी मुलगी प्रार्थना हिला शंकराच्या वेशभूषेत नंदीवर बसविले तर युवराज रोटकर गणेशजीच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेत आहे.

loading image
go to top