esakal | धक्कादायक! दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन? नागपूरच्या कंपनीची  ५२ किलो स्फोटके काश्मिरात आढळली 
sakal

बोलून बातमी शोधा

 52 kg explosives of Nagpur-based company found in Kashmir

काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा दलांकडून विशेष अभियान राबविले जात आहे. विशेषतः स्फोटकांचा शोध घेतला जात आहे. .

धक्कादायक! दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन? नागपूरच्या कंपनीची  ५२ किलो स्फोटके काश्मिरात आढळली 

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : भारतीय सैन्यदलाने अलीकडेच दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावत काश्मीरच्या कारेवा गावातील पाण्याच्या टाक्यांमधून जप्त केलेली स्फोटके आणि डिटोनेटर्सच्या पाकिटांवर नागपूरच्या कंपनीचे नाव आढळून आले आहे. काही वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटातही याच कंपनीची स्फोटके आढळल्याने कंपनी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा दलांकडून विशेष अभियान राबविले जात आहे. विशेषतः स्फोटकांचा शोध घेतला जात आहे. .

क्लिक करा - वयाच्या चाळिशीत पोहोचेल्या पुरुषांनी 'या' तपासण्या करायलाच हव्या

गेल्या आठवड्यात भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे ॲापरेशन राबविण्यात आले. या दरम्यान 'जैश-ए-मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेच्या हालचालींची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. 

त्या आधारे कारेवा गावाजवळ कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये अंदाजे ५२ किलो स्फोटके सापडली. त्यावर नागपूरच्या बाजारगाव परिसरातील 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचे नाव आढळून आले आहे. ही कंपनी बाजारगाव परिसरातील शंभर हेक्टर जागेत असून, २०१२ मध्ये कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे.

जाणून घ्या - कोरोनाबळींच्या अंत्यसंस्कारासाठी शुल्क वसुली, नातेवाईकांची ऐनवेळी पैशासाठी धावाधाव

या कंपनीत तयार होणाऱ्या जिलेटिनच्या कांड्यांचा विहिरीतील दगड फोडणे तसेच खाणींमध्ये केला जातो. प्रत्येक पाकिटावर एक बारकोड असतो. स्फोटके कशी वापरायची, एक्स्पायरी डेट आदी माहिती त्यावर असते. २००७ मध्ये हैदराबाद येथील दुहेरी बाँम्बस्फोटातही संबंधित कंपनीची स्फोटके वापरण्यात आल्याची चर्चा होती. या प्रकरणाची नागपूर पोलिसांकडून चौकशीही करण्यात आली होती. आता याच कंपनीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top