esakal | नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह, परिसर सील
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह, परिसर सील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात पुन्हा एकाच कुटुंबातील सहा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (corona positive) आली आहे. डेल्टा प्लसचे (delta plus) संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. यामुळे लक्ष्मी नगर (laxmi nagar nagpur) येथील परिसर सील करण्यात आला आहे. (6 people of same family found corona positive in nagpur)

हेही वाचा: ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

काही दिवसांपूर्वी उमरेड येथील मुंबईहून परतलेल्या एका युवतीचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित आढळले होते. डेल्टा प्लसचा संशय असल्याने हैदराबादेतील प्रयोगशाळेकडे नमुने पाठवण्यात आले. मात्र ते नमुने डेल्टा प्लस निगेटिव्ह आले. मात्र भय अद्यापही असल्याने शहरातील नीरीमधून ५०० हून अधिक संशयितांचे नमुने हे हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापैकी एकाही नमुन्यात ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ आढळून आलेला नाही. हे विशेष. नीरीच्या प्रयोगशाळेतील डॉ. कृष्णा खैरनार यांच्या मार्गदर्शनात हे नमुने पाठविण्यात येत आहेत. नीरीत या नमुन्यांवर जीनोम सिक्वेंन्सिंग करुन हे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. नमुन्यांवर ९० टक्क्यांपर्यंत काम नीरीतच होत आहे. यामुळेच हैद्राबादवरुन अहवाल आगामी २ ते ३ दिवसात येतात. यापुढे दिल्ली येथील आयसीएमआरकडे अहवाल जाणार आहे.

५०० नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत -

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी तिसऱ्या लाटेचे संकटाची भविष्यवाणी झाली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेतील डेल्टा प्लस व्हेरियंट हा राज्यातील इतर जिल्ह्यांत आढळून आल्याने नागपूरची चिंता वाढली आहे. कोरोना संक्रमण नियंत्रणासाठी जीनोम सिक्वेन्सिंग गरजेचे आहे. यामुळेच नीरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेत (नीरी) जीनोम सिक्वेंसिंग करण्यात येते. नीरीत जीनोम सिक्वेंसिंग करून सुमारे ५०० वर डेल्टा प्लस संशयितांचे नमुने हैद्राबादच्या ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅन्ड मॉलिक्यूलर बॉलॉजी’प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

loading image