१०० कोटींची घरे आणि ६० कोटींचे रस्ते; नागपूर सुधार प्रन्यासचा तब्बल ६०६ कोटींचा अर्थसंकल्प

nit
nit

नागपूर ः आगामी वर्षात शंभर कोटींची घरे आणि साठ कोटी रुपयांची रस्ते शहरात बांधण्याचा संकल्प सुधार प्रन्यासने केला असून याकरिता ६०६ कोटी ८८ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी विश्वस्त पिंटू झलके, भूषण शिंगणे, नगर रचना विभागाचे सह संचालक राजेंद्र लांडे, कार्यकारी अधिकारी ललित राऊत, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुप्रिया जाधव, लेखा अधिकारी यशवंत ढोरे आणि शाखा अधिकारी राजेश काथवटे आदी उपस्थित होते. 

प्रन्यास भांडवली खर्च ३७४.४७ कोटी, महसुली खर्च १४५.३४ कोटी आणि अग्रिम व ठेवी ८३.०७ कोटी असे एकूण ६०२.८८ कोटी विविध विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भाजपने सुधार प्रन्यासच्या बरखास्तीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येतात बरखास्तीचा निर्णय फिरवण्यात आला आहे.

ठळक वैशिष्ट्ये

-घरबांधणी कार्यक्रमांतर्गत शंभर कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
-५७२ आणि १९०० अभिन्यासामध्ये मूलभूत सुविधांसाठी ७० कोटी
-रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ६० कोटी
-प्रन्यासच्या दोन विभागीय कार्यालयाच्या इमारती बांधकामाकरिता १० कोटी
-दलित वस्ती, दलितेतर वस्ती, ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटर, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान इत्यादीसाठी १०७.४९ कोटी 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com