नागपूर : बाजारात खजुराचे ६५ प्रकार उपलब्ध!

रमजानसाठी १०० टन माल बाजारात, अरबी वाणावर उड्या
65 varieties of Date palm available in the market Ramadan nagpur
65 varieties of Date palm available in the market Ramadan nagpur sakal

नागपूर : रमजान आणि उपवासाच्या दिवशी खजुराचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लालसर आणि पिवळसर असलेल्या खजुराच्या तब्बल ६५ जाती आहेत. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने बाजारात खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खजूर, पेंडखजूर, खारीक अशा विविध नावाने हे फळ ओळखले जाते. भारतापेक्षा अरबस्थानातून आलेल्या खजुराला रमजानच्या महिन्यात मोठी मागणी असते.

बाजारात खजुराचे ६५ प्रकार उपलब्ध!

सलग दोन वर्षे टाळेबंदी आणि कोरोनामुळे आखाती देशातून खजुराची आवक कमी झाली होती. यावर्षी बाजारात ६५ पेक्षा जास्त प्रकारचे आणि अगदी ६० रुपयांपासून तर १५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत खजूर बाजारात उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी उलाढाल वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

रमजान महिन्यात इफ्तारला खजूर खाऊन रोजा सोडला जातो. यामुळे पेंडखजुराला विक्रमी मागणी असते. विशेषतः अरबी देशातून येणाऱ्या खजुराला अधिक पसंती मिळत आहे. ८० रुपयांपासून ६०० रुपये प्रति किलो विविध प्रकारची खजुराची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. खजूर सेवन करण्यास धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. निर्जल रोजा करताना शरीरातील थकवा नाहीसा करणे, यासाठी असलेले जीवनसत्त्व यातून मिळते. मुस्लिम बांधवांकडून अजूनही ती संस्कृती जपली जात आहे. त्यानिमित्ताने रमजानमध्ये सर्वात पहिला कल खजूर खरेदीकडे असतो. सध्या विविध प्रकारचे खजूर बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. ८० ते ६०० रुपये प्रति किलो खजूर विक्री होत आहे. या वर्षी महागाईमुळे किंचित दरांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, कोरोनानंतर समाजातील आर्थिक परिस्थिती पाहता जुन्या दरानेच माल विक्री केला जात आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

खजुराचे महत्वाचे प्रकार

-आजवा, कलमी, इराण बॉम्ब, कियान, मरियम, सुक्री, मेडझोल, मुझापती

खजुराचे फायदे

  • शरीरातील थकवा घालवते

  • रक्ताचे प्रमाण वाढविण्यास मदत

  • पाण्याची कमतरता भरून काढते

  • नैसर्गिक साखर, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशियमचा शरीराला पुरवठा

मुख्य खजुराचे दर

प्रकार (दर प्रतिकिलो)

  • मेडझोल १४०० ते १५००

  • मुझापती ४०० ते ५००

  • कियान २५० ते ३००

  • साधी ८० रुपये

युद्धजन्यस्थितीमुळे आवक कमी आहे. मात्र, भाव वाढ झालेली नाही. सर्वत्र महागाई वाढत असल्याने खजुराचे दर स्थिरावलेले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अरबस्थानमधून येणाऱ्या खजुरला अधिक मागणी आहे.

- किरण दप्तरी, संचालक श्री ड्रायफ्रुटस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com