esakal | दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक; एकाच दिवशी ७२६६ कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक; एकाच दिवशी ७२६६ कोरोनामुक्त
दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक; एकाच दिवशी ७२६६ कोरोनामुक्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः कोरोनबाधितांचा आकडा रोज नवे विक्रम करत आहे. मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यातून ७२२९ जणांना कोरोनाने गाठले. महिनाभरानंतर प्रथमच बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ७२६६ जणांनी एकाच दिवशी कोरोनाला हरवले. मात्र या कोरोनाच्या चक्रव्यूहात आज ९८ बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत मृत्यूची संख्या ६५७५ वर पोहचली.

हेही वाचा: कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना दातांची समस्या; दंतरोग तज्ज्ञांचं मत

आज दिवसभरात जिल्ह्यातून २४ हजार १६३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. असून यातील यातील ५ हजार २२९ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आढळला. यात शहरातील ४ हजार ७८७ जण तर ग्रामीण भागातील १ हजार ५४९ बाधित आढळले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून रेफर झालेल्या ८ जणांना बाधा झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ७१ हजार ५५७ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ४३ हजार ७५४ रुग्ण हे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. उर्वरित २७ हजार ८०३ रुग्ण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांचा विळखा वाढत असतानाच मृत्यूसत्राचा वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९८ कोरोना संक्रमित रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. यातील ५२ जण हे शहरातील आहेत. तर ३८ जण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी होते. जिल्ह्याबाहेरून शहरात उपचाराला आलेल्या ८ बाधितांचा आज मृत्यू नोंदविला गेला. जिल्ह्यात शिरकाव केल्यापासून या विषाणूच्या विळख्यात अडकलेल्यांची संख्या साडेतीनलाखाच्या उंबरठ्याजवळ पोहचली आहे.

हेही वाचा: 'तुम्हाला कार हवे की पैसे?' युवकानं दिलं उत्तर आणि घडला भयंकर प्रकार

कोरोनामुक्तांचा दर ७८ टक्क्यांपर्यंत

कोरोनाच्या बाधेवर आज मात करणाऱ्यांची संख्या ७२६६ आहे. यामुळे आतापर्यंत विषाणूमुक्त होऊन घरी परतलेल्यांची संख्या २ लाख ६५ हजार ४५७ झाली आहे. आजारमुक्तीचा हा सरासरीदर जवळजवळ ७७.३० टक्क्यांवर आहे. हा दर कधीकाळी ९० टक्के होता. मात्र एकाच महिन्यात हा दर १३ टक्क्यांनी खाली आला आहे. जिल्ह्यातील ७१ हजार ५५७ बाधितांपैकी ५५ हजार ५२४ बाधितांना लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले १६ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ९ हजार ८०४ बाधितांवर मेयो, मेडिकल, एम्स, अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह नागपुरातील इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये उपचार घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ