नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश ८१ टक्क्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश ८१ टक्क्यांवर

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयामधील(engineering college) प्रवेशामध्ये रिक्त जागांची संख्या यंदा घटली आहे. विभागातील एकूण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असलेल्या एकूण जागांपैकी ८१. ५६ टक्के जागा भरल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा प्रवेशाबाबत आशादायी चित्र निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पुणे, मुंबई ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. त्यामुळे एमएच-सीईटीसह(MH-CET) इतर प्रवेश पात्रता परीक्षांचे निकाल लागताच, विद्यार्थी प्रवेशासाठी पुणे, मुंबईच्या दिशेने धाव घेतात. पालकांकडून या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी(college admission) डोनेशन देण्याची तयारी असते. याचाच परिणाम म्हणून एकेकाळी विद्यार्थ्यांनी भरलेल्या महाविद्यालयांवर गेल्या सहा ते सात वर्षांपासून रिक्त जागांचे संकट ओढविले.

हेही वाचा: जळगाव : भाजपच्या २९ नगरसेवकांना जळगावमध्ये अपात्रतेची नोटीस

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट ओढविले आहे. त्यातही गेल्या वर्षी विभागातील ३५ टक्के विद्यार्थ्यांनी बाहेरचा पर्याय निवडला होता. त्यामुळे यावर्षीही जवळपास अशीच परिस्थिती असेल अशी संस्थाचालकांसह शिक्षक आणि प्राचार्यांची मानसिकता होती. मात्र, यंदा एप्रिल ते जूनदरम्यान आलेल्या दुसऱ्या लाटेचा अनेकांनी धसका घेतला. या लाटेत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. अशा परिस्थितीत या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या मनःस्थितीत पालक सध्या दिसून आले नाही. त्यामुळे गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या प्रवेशात पाच टक्क्यांची वाढ दिसून आली.

दरम्यान यावर्षी राज्याच्या सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यात आले. त्याची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आल्यावर २९ नोव्हेंबरपासून प्रवेश फेरीस सुरुवात करण्यात आली. त्यानुसार यावर्षी नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ८१.५६ टक्के प्रवेश झाले आहे. यामध्येही नामवंत महाविद्यालयातील प्रवेश जवळपास फुल्ल झाले असल्याचे दिसून येत आहे. यामध्येही सर्वाधिक ८५ टक्के प्रवेश नागपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: रिपाइंचा हात आणि साथ कुणाला? काँग्रेस-भाजप सक्रिय

आयटी, कॉम्प्युटरला पहिली पसंती

पहिल्या यादीनुसार अभित्रिकींच्या प्रवेश प्रक्रियेत आयटी, कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशल इंटेलिजन्स यासारख्या विषयात प्रवेश फुल्ल झाले आहेत. दुसऱ्याही यादीमध्ये याच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसून आले. मात्र, मेकॅनिकल, सिव्हिल या कोअर शाखांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top