

Love and Resilience: Rahim Bhai & Anasna’s Inspiring Story of Togetherness
Sakal
नागपूर : वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ दांपत्यांना मुलांचा आधार असतो. घराच्या ओसरीवर नातवंडांचा सहवास मिळतो. मात्र हे दांपत्य या साऱ्या प्रेमाला पारखे झाले. या दोघांचेही दररोजच्या जगण्याचे वास्तव पूर्णतः वेगळे आहे. मुले असूनही या ज्येष्ठ दांपत्याला मागील वीस वर्षांपासून आयुष्याचा प्रवास एका जुन्या तीनचाकी रिक्षावर सुरू ठेवावा लागला आहे. एकमेकांच्या साथीने ऊन वारा पाऊस झेलत, मिळेल त्या माधुकरीवर जगत आहेत. त्या दांपत्याचे नाव रहीम भाई आणि पत्नी अनसना. त्यांना भेटायचे असेल, संवाद साधायचा असेल तर कोण्यातरी चौकात त्यांचा रिक्षा उभा दिसते.