Chandrapur News : शिवणीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार ; मृताच्या कुटुंबीयांना पन्नास हजारांची मदत

तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार (ता. ४) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास शिवनी वनपरिक्षेत्रातील कुकडहेट्टी उपक्षेत्रातील पेटगाव (खातेरा) येथील कक्ष क्रमांक ३२२ मध्ये घडली.
Chandrapur News
Chandrapur Newssakal

सिंदेवाही : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार (ता. ४) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास शिवनी वनपरिक्षेत्रातील कुकडहेट्टी उपक्षेत्रातील पेटगाव (खातेरा) येथील कक्ष क्रमांक ३२२ मध्ये घडली. मृत महिलेचे नाव दीपा दिलीप गेडाम (वय३३ रा. बाम्हणी (माल)) असे आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. सिंदेवाही तालुक्यात मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम सुरू आहे. जंगलाशेजारी असलेल्या गावातील महिला, पुरुष सकाळीच जंगल परिसरात जाऊन मोहफुले आणि तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम करतात.

बाम्हणी येथील दीपा दिलीप गेडाम हा नेहमीप्रमाणे शिवणी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कुकडहेट्टी उपक्षेत्रातील पेटगाव (खातेरा) येथील जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ३२२ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेली होती. सकाळी साडेआठ वाजतादरम्यान दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. शेजारी असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला.

मात्र, तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती शिवणी वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमल्याने सिंदेवाही पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वनविभागाच्या मदतीने जमावाची समजूत घातली.

Chandrapur News
Amravati Crime : शहरात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा आढळल्या

मृत महिलेच्या मृतदेहाला शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. वनविभागाकडून पन्नास हजारांची तात़डीची मदत गेडाम कुटुंबीयांना देण्यात आली. यावेळी शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहाय्यक एस. वाय. बुले, क्षेत्र सहायक नल्लेश्वर पेंदोर, वनरक्षक मडावी यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com