esakal | आधुनिक काळात बाळंतीणींची आई झाली आराधना ताठे; घरगुती व्यवसायातून ठरल्या ‘स्वयंसिद्धा’
sakal

बोलून बातमी शोधा

Aaradhana tathe give Mother's love to pregnant woman

जुन्या काळात मुलगी बाळंतीण असली की, माहेरातून डिंकाचे लाडू आणि मेव्याचे लाडू पाठविण्यात येत असत. मात्र, आजकाल या महिलांचा कल जंक फूड खाण्याकडे असतो. त्या महिलांना अशा परिस्थितीत न्युट्रीशिअस फूड देणे गरजेचे असते. त्यामुळे अशा महिलांसाठी आराधना यांनी घरगुती उद्योगातून असे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली.

आधुनिक काळात बाळंतीणींची आई झाली आराधना ताठे; घरगुती व्यवसायातून ठरल्या ‘स्वयंसिद्धा’

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : आधुनिक काळात बाळंतपणातही आवश्यक असलेले खाद्यपदार्थ आणि ‘बेबी फूड’सुद्धा घरी तयार करण्याची सवय आजच्या महिलांना राहिली नाही. अशा महिलांची गरज ओळखून पोषण आहाराचा पुरवठा व्हावा यासाठी सहाव्या महिन्यापासून आवश्यक असलेले दर्जेदार ‘बेबी फूड’ तयार करून आराधना ताठे बाळंतीणींना माहेरची माया देण्याचे काम करीत आहेत.

एमएस.स्सी बायोटेक, बीएड, नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करून आराधना ताठे यांनी शिक्षिका म्हणून शाळेत काम केले. यानंतर पतीची पुण्याहून नागपूरला बदली झाल्याने नारायणा शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली. यादरम्यान त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली होती. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसायास देण्याचे ठरविले.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

मुळात ‘न्युट्रीशिअस फूड’ तयार करण्याची आवड असल्याने त्या विषयाची पदवी न मिळविता बाळंतीणींना त्या काळात आवश्यक असलेले डिंक लाडू, खसखशीचे खिर मिक्स, आळीव खीर मिक्स या सारखे पदार्थ आणि ‘बेबी फूड’ तयार करून देतात. मुळात आईचे दूध बाळासाठी सर्वांत चांगले अन्न असते. मात्र, त्याबाबत देशात जागरूकता नसल्याने मुलांना ते मिळत नाही.

जुन्या काळात मुलगी बाळंतीण असली की, माहेरातून डिंकाचे लाडू आणि मेव्याचे लाडू पाठविण्यात येत असत. मात्र, आजकाल या महिलांचा कल जंक फूड खाण्याकडे असतो. त्या महिलांना अशा परिस्थितीत न्युट्रीशिअस फूड देणे गरजेचे असते. त्यामुळे अशा महिलांसाठी आराधना यांनी घरगुती उद्योगातून असे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. आज त्यांचे पदार्थ केवळ नागपुरात नाही तर देश-विदेशात विकले जातात. माहेरातील माणसे आठवणीने त्याच्याकडील पदार्थ खरेदी करीत मुलींना पाठवितात, हे विशेष...

हेही वाचा - चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन, विधवा महिला अलिशान बी. ने घेतले विक्रमी उत्पादन

निःशुल्क मार्गदर्शन

केवळ आरोग्यदायी पदार्थ तयार करून विकणे हाच आराधना यांचा हेतू नाही. विविध पदार्थांची त्या रेसिपीही सांगतात. दर महिन्याचा चौथ्या रविवारी डॉ. चैतन्य शेंबेकर यांच्या ओमेगा हॉस्पिटल येथे आहार आणि स्तनपानाचे महत्त्व या विषयावर निःशुल्क मार्गदर्शनही करतात. इतकेच नव्हे तर नेल्सन हॉस्पिटलमध्ये त्या नझल फिडिंगसाठी ट्यूब फिड सुद्दा देतात.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image