Nagpur : महंगाई मार गई ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेतच गेली नऊ वर्षे

महागाईचा आगडोंब; सामान्यांनी जगायचं कसं?
vegetables prices increasing
vegetables prices increasingsakal

नागपूर ता: टोमॅटोसह इतर भाज्या, खाद्य तेल, डाळीनंतर आता तांदुळ, साखरेसह जीऱ्याच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. महागाई आपल्या रंगाची उधळण करीत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच खाद्यान्नाच्या किमती आकाशाला भिडल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे ‘महंगाई मार गई’ अशी सध्याची अवस्था सामान्यांची झाली आहे.

काही राज्यात अति पाऊस तर कुठे पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. परिणामी, खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून कच्च्या मालाचेही भाव वाढले आहेत. बॅंकेच्या गृह कर्जाच्या व्याजाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोजचा खर्चही भागवणे कठीण झाले आहे. मजुरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वंच जण वाढलेल्या भाववाढीने हवालदिल झाले आहेत.

वस्तू - दोन महिन्यांपूर्वीचे दर - आजचे दर

  • साखर -३८ - ४२

  • तांदूळ -४३ - ४७

  • तूरडाळ -१२० - १४०

  • सोयाबीन तेल -१०५ - ११५

  • जिरे -६५० - ८५०

गॅस सिलिंडरच्या किमती आवाक्याबाहेर

नऊ वर्षापूर्वी गॅस सिलिंडर ३२५ ते ३५० रुपयात मिळत होते. त्यानंतर अनुदानाचे सूत्र आले. मात्र, आता अनुदानित सिलिंडरसाठी ११५४.५० रुपये मोजावे लागत आहे. ही विक्रमी भाववाढ आहे. यापोटी ग्राहकांना फक्त ४० ते ५० रुपये अनुदान देण्यात येत आहे.

तूरडाळ गाठणार २०० चा दर

तूरडाळीचे दर दोन महिन्यापूर्वी ११० रुपये प्रति किलो होते. अचानकच मोठ्या कंपन्यांनी साठवणुकीसाठी तुरीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे तूरडाळ प्रति किलो १४० ते १४५ रुपयावर गेली आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसात तूरडाळ २०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

साखरेसह इतरही खाद्य वस्तूंचे भाव वाढलेले असताना जिरे, बदाम, सोप, ओवा, मेथीच्या दरातही वाढ झालेली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांनी खरेदीवर बंधने आणली आहेत. याचा फटका व्यापारालाही बसू लागला आहे.

vegetables prices increasing
Nagpur : चुकीच्या ‘ड्राफ्टिंग’ने मनपा निवडणुकीचा गोंधळ, राज्य निवडणूक आयोगावर आली स्पष्टीकरणाची नामुष्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com