नागपूर : शक्तीपीठ महामार्गाचे टेंडर देण्याच्या अटीवर बड्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतल्यामुळे, शेतकरी व जनतेचा तीव्र विरोध असूनही महामार्ग रेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दररोज मार्ग बदलत असल्याचा सणसणीत आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे.