corona update : नागपुरात ८० दिवसांनंतर कोरोनाबाधित हजाराच्या आत

corona update : नागपुरात ८० दिवसांनंतर कोरोनाबाधित हजाराच्या आत

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) पहिल्या लाटेत जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर २०२० मध्ये कोरोना प्रादुर्भावाने चांगलाच कहर केला होता. मात्र, त्यानंतर परिस्थिती सामान्य झाली. मात्र, नववर्षाच्या २०२१ च्या फेब्रुवारी मध्यावधीपासून कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) जिल्ह्यावर तुटून पडली. जिल्ह्यात दररोज बाधितांसह मृत्यूचा खेळ कोरोनाने मांडला. संख्येचे नवनवीन विक्रम (New record) प्रस्थापित झाले. जिल्ह्यात एकाच दिवशी साडेआठ हजार बाधित तर ११३ मृत्यूचा उच्चांक झाला. परंतु आता दुसरी लाटेचा प्रादुर्भाव सैल झाला. मृतांच्या संख्येतही घट झाली. सोमवारी (ता.१७) जिल्ह्यात जवळपास ८१ दिवसानंतर दैनंदिन रुग्णसंख्येत एक हजाराहून कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील २४ तासांमध्ये ९७१ नवे बाधित आढळले तर ३० जणांचा मृत्यू झाला. (After 80 days within a thousand corona patient in Nagpur)

कोरोनाचा जीवघेणा कहर काहीसा कमी झाला. २७ फेब्रूवारी २०२१ रोजी जिल्ह्यात १३ हजार ०२७ चाचण्या होऊन ९८४ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. यानंतर कोरोना कहर म्हणून जिल्ह्वायवर बरसला. आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५८० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात शहरातील ५ हजार १३७ तर ग्रामीण भागातील २ हजार १८४ मृतकांचा समावेश आहे. तर जिल्ह्याबाहेरील १ हजार २५९ जणांना नागपुरात रेफर केल्यानंतर मृत्यू झाला. यामुळे यांच्या मृत्यूची नोंद नागपुरात झाली.

corona update : नागपुरात ८० दिवसांनंतर कोरोनाबाधित हजाराच्या आत
सायकल दुरुस्ती करणाऱ्याची मुलगी झाली क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी

आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६४ हजार २१४ झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात ९७१ नव्या बाधितांचीच नोंद झाली असून बाधितांच्या तुलनेत चारपटीहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरातील २ हजार २२० व ग्रामीणचे १हजार ६७४ असे ३ हजार ८९४ जण ठणठणीत बरे झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या संख्या ४ लाख २८ हजार ७४४ वर गेली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्क्यांवर आले आहे. सोमवारी झालेल्या ३० मृत्यूंमध्ये शहरातील ११, ग्रामीणमधिल ९ व जिल्ह्याबाहेरील १०जणांचा समावेश आहे.

corona update : नागपुरात ८० दिवसांनंतर कोरोनाबाधित हजाराच्या आत
बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये जास्त कोरोनाबाधित

सध्यस्थितीत शहरात १३ हजार २६८ व ग्रामीणमध्ये १३ हजार ६२२ असे २६ हजार ८९० सक्रिय कोरोनाबाधित (अ‍ॅक्टीव्ह) रुग्ण आहेत. यातील तब्बल २० हजार ७३१ जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले केवळ ५ हजार १८८ जण कोरोनाबाधित मेयो, मेडिकल, एम्स तसेच इतर शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असल्याने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनसह आयसीयू व व्हेंटिलेटरयुक्त ३ हजार १०० वर खाटा रिकाम्या आहेत.

बाधितांचा दर पाचच्या घरात

नागपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा दर फेब्रुवारीच्या मध्यावधीपासून एप्रिलच्या शेवटी ३२ टक्क्यांपलिकडे पोहचला होता. त्या काळात दररोज साडेआठ हजारावर बाधित आढळून येत होते. त्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अल्प होती. आता परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली. बाधितांचा दरही आटोक्यात आला. कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले. सोमवारला शहरात ९ हजार ८१८ तर ग्रामीणमध्ये ३४४३ अशा १३ हजार २६१ चाचण्या झाल्या. त्यापैकी शहरातील केवळ ४.८७ टक्के म्हणजेच ४८७ जण तर ग्रामीण भागातील १३.७७ टक्के म्हणजेच ४७४ जण बाधित आढळले.

(After 80 days within a thousand corona patient in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com