सायकल दुरुस्ती करणाऱ्याची मुलगी झाली क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी

सायकल दुरुस्ती करणाऱ्याची मुलगी झाली क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील शेदूरसनी येथील सायकल दुरुस्ती करणारे शशिकांत कोल्हे यांनी मुलगी कोमल कोल्हे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी (X-ray Scientific Officer) बनल्याने कोल्हे कुंटुबीयांचा (colhe family) आनंद गणात मावेसा झाला आहे. (The daughter of a bicycle repairman became an X-ray scientist)

शशिकांत कोल्हे यांचे लोणबेहळ येथे सायकल स्टोअर्सचे छोटेसे दुकान आहे. सायकल दुरुस्तीच्या कामातून आलेल्या दोन पैसावर उदरनिर्वाससह मुलाबाळाचे शिक्षण करतात. शशिकांत कोल्हे व चित्रा शशिकांत कोल्हे यांना तीन आपत्य आहेत. मोठी मुलगी रिना कोल्हे हिचे लग्न झाले तर दुसऱ्या नंबरची कोमल आणि तिसरा मुलगा साईराम कोल्हे शिक्षण बी. काॅम सुरू आहे.

सायकल दुरुस्ती करणाऱ्याची मुलगी झाली क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

कोमल कोल्हे हीचे बी.ए.सीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यावर्षी एम.ए.सी प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. कोमल कोल्हे हिने सन २०१९ला आरोग्य खात्याची परीक्षा दिली होती. आरोग्य खात्यातील परीक्षेत मुलीमधून प्रथम येण्याचा मान कोमल हिने पटकावला होता. आरोग्य खात्यातील दिलेल्या परीक्षेतून कोमल कोल्हे हिला क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी भंडारा येथे रजू होण्याची ऑर्डर प्राप्त झाली.

गरीब कुंटुबीयातील मुलगी कोमल हिने मोठ्या मेहनतीने अभ्यास करून शेदूरसनी ते आर्णी असा पंधरा किलो मीटर प्रवास करून शैक्षणिक शिक्षण पूर्ण केले. आपण अधिकारी व्हावे असे स्वप्न बघणाऱ्या कोमलने चिकाटीने मोठ्या जिद्दीने अभ्यास करून स्वप्न पूर्ण केले आहे. सायकल दुरुस्ती करणारे शशिकांत कोल्हे यांची मुलगी क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी भंडारा येथे रजू झाल्याची वार्ता शेदूरसनी, लोणबेहळ येथे कळतातच कोल्हे कुंटुबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

सायकल दुरुस्ती करणाऱ्याची मुलगी झाली क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

गरीब मुलांसाठी आदर्श

गरिबीमुळे शिक्षण घेता येत नाही असा गैरसमज अनेकांचा आहे. परंतु, अभ्यासात जिद्द आणी मेहनत केली तर नक्कीच यशसंपादन होते हे कोमल कोल्हे हिने दाखवून दिले आहे. तालुक्यातील शेदूरसनी येथील गरीब कुटुंबीयातील मुलगी कोमल ही क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी झाल्याने गोरगरीब मुला-मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

(The daughter of a bicycle repairman became an X-ray scientist)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com