राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फी वाढीला स्थगिती

ओल्या दुष्काळाचे सावट, सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती आणि कोणालाही विश्वासात न घेता २० टक्के शुल्क वाढीचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.
After protest Bharatiya Janata Yuva Morcha Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University fee hike postponed
After protest Bharatiya Janata Yuva Morcha Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University fee hike postponedsakal

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलनानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षांपासून २० टक्के शैक्षणिक शुल्क वाढवण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात आली. ओल्या दुष्काळाचे सावट, सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती आणि कोणालाही विश्वासात न घेता २० टक्के शुल्क वाढीचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. हा निर्णय विद्यार्थी व पालकांवर मोठा भुर्दंड ठरला असता. त्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी आघाडीने आंदोलन केले. सोमवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची बैठकीतच भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट धडक दिली. बैठक संपताच कुलगुरू यांनी शुल्कवाढीला तुर्तास स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

आंदोलनाला प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले , प्रदेश सदस्य देवा डेहणकर, रितेश राहाटे, शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, सन्नी राऊत, पंकज सोनकर हे उपस्थित होते. विद्यार्थी आघाडीचे शहर संयोजक संकेत कुकडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात सह-संयोजक गौरव हरडे, सुभाष खेमानी, आशिष मोहिते, शिवाम पांढरीपांडे, प्रशांत बघेल, साहील गोस्वामी, प्रणित पोचमपल्लीवार, कौस्तुभ बैतुले यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.

एनएसयूआयच्या लढ्याला यश

या शुल्कवाढ रद्द झाल्याचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिक्षक मंचचे सदस्य प्रयत्न करताना दिसत होते. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांनी एन.एस.यू.आय. आणि युवक काँग्रेसच्या नावाने पत्र दिले. त्यामुळे एनएसयुआयच्या पुढाकाराने हा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. नागपूर विद्यापीठाने सर्वच अभ्यास क्रमांचे प्रवेश शुल्क २० टक्के वाढविल्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार विद्यार्थिच्या तक्रारी, कोविडची परिस्थिती, ओला दुष्काळ तसेच वाढती महागाई या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना तक्रार केली.

शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. परंतु कुलगुरूंनी सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे युवक कॉंग्रेस व एन.एस.यू.आय. उपोषण सुरु केले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने शुल्क वाढ रद्द केली आहे. आंदोलनात नागपूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष आशीष मंडपे, एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पांडे, प्रदेश महासचिव प्रतीक कोल्हे, सौरभ श्रीरामे, प्रणयसिंह ठाकूर, विनोद नौकरिया, रॉयल गेडाम, विद्यासागर त्रिपाठी, दया शाहू, अंकित बोहात, साहिल गायकवाड, हर्ष बर्डे, राजरतन रामटेके, सौरभ का‍‍ळमेघ, रौनक नांदगावे, कुणाल चौधरी, चेतन मेश्राम सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com