

Prataprao Pawar
sakal
नागपूर : गेल्या सोळा वर्षांपासून विदर्भात कृषी क्षेत्रात बदल घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत असलेल्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात रविवारी ऐतिहासिक दिवस ठरला. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (एआय-एमएल-आयओटी) या तंत्रज्ञानाच्या वापरावर ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नॅशनल ब्यूरो ऑफ सॉईल सर्व्हे ॲण्ड लॅण्ड यूज प्लॅनिंग (एनबीएसएसएलयूपी) आणि बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात एआय आधारित कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.