23 Irrigation Projects Sanctioned Together Under Ajit Pawar
Sakal
नागपूर
Ajit Pawar: अमरावतीला दिली एकाच वेळी २३ सिंचन प्रकल्पांची भेट; सिंचन अनुशेष निर्मूलनात अजितदादांचा धाडसी निर्णय!
Ajit Pawar irrigation policy for Vidarbha: अजित पवारांच्या धाडसी निर्णयाने अमरावतीत २३ सिंचन प्रकल्पांची मुहूर्तमे
-कृष्णा लोखंडे
अमरावती: सिंचनाच्या क्षेत्रात सर्वाधिक मागास अमरावती विभागातील अनुशेष भरून काढण्यासाठी अजितदादा पवार यांचा बहुमोल वाटा आहे. अनुशेष निर्मूलनासाठी प्रा. बी. टी. देशमुख, नितीन गडकरी, डॉ. सुनील देशमुख, ही नेतेमंडळी लढा देत असताना अजित पवार शांतपणे मार्ग शोधत होते. त्यासाठी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा होत असे व रोध-अवरोध झुगारत एकाच झटक्यात त्यांनी अमरावतीच्या २३ सिंचन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्याची किमया करून दाखवली. त्यांच्या या धाडसाने अमरावती जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात मोठी मदत झाली आहे.

