Vijay Wadettiwar
sakal
नागपूर : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली, त्यावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहीत नव्हते? या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे माध्यमांशी बोलताना केली.