

When Dark Clouds Surrounded the Helicopter, CM Reassured Ajit Dada
Sakal
गडचिरोली : महाराष्ट्राच्या राजकारणातील बेधडक आणि सतत कार्यशील असे ‘दादा’ व्यक्तिमत्त्व अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार (ता. २८) बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असताना सर्वत्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यावासीयांनी सुद्धा त्यांच्या अनेक आठवणी जपल्या आहेत. विशेष म्हणजे अजितदादा दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांचे हेलिकाॅप्टर जवळपास क्रॅश होता होता वाचले होते. गडचिरोलीत पोहोचल्यावर जाहीर कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा स्वत:च सांगितला होता. पण ‘त्या’ गडचिरोली दौऱ्यात मिळालेले मृत्यूचे संकेत अखेर खरेच ठरले.