esakal | Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता वर्षाला होते पाच कोटींवर उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

Akash Katole has invested Rs 15 lakh and has a turnover of Rs 5 crore

आकाशने २०१७ मध्ये केवळ दीड लाखांची गुंतवणूक करून सीए रोडवरील छापरूनगर येथे पॉश ऑफिस थाटले. दिवसरात्र कसून मेहनत त्याने अवघ्या तीन वर्षांत उलाढाल पाच कोटींवर नेली. 

Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता वर्षाला होते पाच कोटींवर उलाढाल

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश तरुण उदरनिर्वाहासाठी नोकरी करतात. मात्र, आकाश काटोलेला दुसऱ्याची नोकरी करायची नव्हती. पुण्यातील मल्टीनॅशनल कंपनीने देऊ केलेले लाखोंच्या पॅकेज धुडकावून त्याने स्वतःचा व्यवसाय थाटला. केवळ दीड लाखांची गुंतवणूक करून सुरू केलेल्या व्यवसायाची भरभराट होऊन अवघ्या तीन वर्षांत उलाढाल पाच कोटींवर नेली.

महाल परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय आकाशने साधारण तीन-चार वर्षांपूर्वी एमबीए केले. त्यानंतर लगेच पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. कंपनीने साडेतीन लाखांचे पॅकेज देऊ करत आकाशाला नियुक्तीचे पत्र पाठविले. मात्र, पुण्यासारख्या मोठ्या शहरात ‘जॉब’ करणे त्याच्या व्यावसायिक मनाला पटले नाही आणि नकार कळवत नागपुरातच राहण्याचा निर्णय घेतला.

जाणून घ्या - सकाळच्या वेळी शेतातून येत होता खळखळ आवाज; जाऊन बघताच तळपायाची आग गेली मस्तकात 

सुरुवातीला काही महिने संगणक शिक्षक व दुरुस्तीची कामे केल्यानंतर भविष्यातील योजनांबद्दल विचारमंथन सुरू केले. मित्रांसोबत नवनव्या आयडियाजवर चर्चा करीत असताना एकेदिवशी ‘बियॉंड डेस्टिनेशन’ची कल्पना पुढे आली. आकाशने २०१७ मध्ये केवळ दीड लाखांची गुंतवणूक करून सीए रोडवरील छापरूनगर येथे पॉश ऑफिस थाटले. दिवसरात्र कसून मेहनत त्याने अवघ्या तीन वर्षांत उलाढाल पाच कोटींवर नेली. 

कोरोनाच्या काळातही ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद

हॉटेल व विमानाचे तिकीट बुकिंग करण्यापासून डोमेस्टिक व इंटरनॅशनल टूर, हनिमून पॅकेज, कार्पोरेट टूर्स, क्रूझ, व्हिसा इत्यादी कामे ‘बियॉंड डेस्टिनेशन’च्या माध्यमातून केली जातात. कोरोनामुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनची स्थिती असली तरी व्यवसायावर खूप फरक पडला नाही. कोरोनाच्या काळातही ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आकाशने सांगितले. 

मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा इतिहास आणि घडली अनुचित घटना

नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न
नोकरी न करता आयुष्यात वेगळे काही करायचे होते. म्हणूनच मार्केटमधील ट्रेंड बघून मी ‘बियॉंड डेस्टिनेशन’ची स्थापना केली. तीन वर्षांमध्ये ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, भविष्यात आणखी नवीन संधी शोधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
- आकाश काटोले,
संस्थापक, बियॉंड डेस्टिनेशन

loading image
go to top