Akola Crime: गुटखा विक्रीसह बेशिस्त वाहतुकीला लगाम, दहीहांडा पोलिसांची विशेष मोहीम; पाच लाख रुपयांचा दंड वसूल

दहीहांडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी अवैध गुटखा, पान मसाला विक्री व बेशिस्त वाहनचालकांवर धडाधड कारवाई सुरू केल्याने अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Akola Crime
Akola CrimeEsakal

Akola Police Action on Gutkha Selling: गुटखा, पान मसाला विक्रीसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करवाई करून गत तीन महिन्यात २०० वाहनचालकांवर व ४१ गुटखा विक्रीवर कारवाई करीत तब्बल पाच लाख ३२ हजार रुपये दंड वसुली दहीहांडा पोलिसांकडून करण्यात आली आहे.


दहीहांडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी अवैध गुटखा, पान मसाला विक्री व बेशिस्त वाहनचालकांवर धडाधड कारवाई सुरू केल्याने अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत विशेष कारवाईचाही समावेश आहे. दहीहांडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चोहोट्टा बाजार, दहीहांडा बस थांब्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

बस थांब्यावर वाहन पार्कींग केलेमुळे प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी बस व इतर वाहनांना अडचण निर्माण होत होती. साहजिक त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांनाही ब्रेक लागत असल्याने बस थांब्यावर वाहतूक कोंडी प्रमाणे परिस्थिती होत होती. त्यामुळे ही विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

गत नोव्हेंबरपासून आजपर्यंतच्या कालावधीत दहीहांडा पोलिसांनी वाहतूक नियमाबाबत वेगवेगळ्या मोहीम राबवून वाहतूक नियम पायदळी तुडविणाऱ्या एकूण २०० चालकांवर कारवाई केले आहे. हेल्मेट न घालणे १०५, काळी काच लावून कार चालविणे २१, ट्रिपल शिट ७४ या कारवाईचा त्यामध्ये समावेश आहे. या कारवाईत वाहतूक पोलिसांनी चार लाख ९२ हजार १३२ रुपये दंड वसूल केला आहे.

गुटखा पान मसाला विक्रीवर कारवाई
गुटखा, पान मसाला व सुगंधित पदार्थांची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री होत आहे. त्यामुळे दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी गत काही दिवसांपासून या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात माेहीम हाती घेतली आहे. दहीहांडा पोलिस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणांहून ३९ हजार ८६८ किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केले, तर या पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४१ कारवाईमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाहनचालकांनी नियमांचे पालन केले, तर कारवाईची गरज नाही. शिवाय सर्वांना विना अडथळा, विना वाहतूककोंडी सुरळीत प्रवास शक्य आहे. मात्र, तसे न केल्याने दंडात्मक कारवाई करावी लागते. वाहतूक नियमांचे पालन करावे हेच वाहनचालकांना आवाहन आहे. त्याच प्रमाणे राज्यात गुटखा बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. तरुण मंडळी गुटख्याला बळी पडले आहेत. गुटख्याला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
- योगेश वाघमारे, ठाणेदार, पोलिस स्टेशन, दहीहांडा.(Latest Marathi News)

Akola Crime
Article 370 Movie Review : आर्टिकल 370 पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितला review, यामी गौतमच्या अभिनयाबद्दल सांगितलं असं काही..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com