Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी साधणार रविवारचा मुहूर्त

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय्य तृतीया शुक्रवारी येत असल्याने रविवारी सुटीची संधी साधत सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची होण्याची शक्यता आहे.
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024esakal

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय्य तृतीया शुक्रवारी येत असल्याने रविवारी सुटीची संधी साधत सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची होण्याची शक्यता आहे. घर, फ्लॅट, प्लॉट, दुचाकी, कार, गृहपयोगी उपकरणे खरेदीसाठी नागरिक सज्ज आहेत. सोने-चांदीचे दर चढे असले तरीही लोकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत आहे.

गुढीपाडव्याला ग्राहकांनी बंपर खरेदी केली होती. आता अक्षय्य तृतीयेला सर्व बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मुहूर्तावर वस्तू मिळाव्यात म्हणून ग्राहकांकडून रविवारच्या सुटीनिमित्त खरेदीचे मनसुबे आखलेले आहेत.

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

रिअल इस्टेटला अच्छे दिन

भूखंड, फ्लॅट, गृहखरेदीवर लोकांचा भर असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी भरघोस सूट, आकर्षक पेमेंट योजना अशा ऑफर्स देऊ केल्या आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक चित्र असेल. अनेकजण आपल्या ''ड्रीम होम''चे स्वप्न पूर्ण करतील आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल होईल, अशी आशा बांधकाम व्यावसायिकांना आहे.

इलेक्ट्रॉनिक, वाहन खरेदीला पसंती

मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. उन्हाळ्यात एसी आणि फ्रिजला मागणी अधिक असते. रविवारच्या मुहूर्तावर खरेदीचा आरंभ होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

अनेकांनी मोठ्या आकारातील वस्तूंचे बुकिंग होतील असेही संचालकांनी सांगितले. बुकिंग आधी करून वाहन घरी नेण्याची प्रथा आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बुकिंग करण्यावर भर आहे. यंदा इलेक्ट्रिक वाहनांचा टक्का वाढणार आहे. या बाजारात कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज आहे.

सराफा बाजारात उत्साह

गेल्या पंधरा दिवसात सोने आणि चांदीच्या दराने नवनवीन विक्रम केलेत. सोन्याने प्रतिदहा ग्रॅम जीएसटीसह ७५ हजारांचा आकडा पार केला तर चांदी प्रतिकिलो ८५ हजारांच्या पार झाली होती. आता त्यात घसरण होऊ लागली असून सोने जीएसटीसह ७३ हजारावर वर चांदी ८१ हजारांवर आलेली आहे. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दोन्ही धातूंच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत आहेत. भाव कमी झाल्याने सराफांनी काही दिवसांआधी सोन्याचे नाणे आणि दागिन्यांचे बुकिंग सुरू केले आहे. डिलिव्हरी अक्षय्य तृतीयेला देणार आहे.

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com