रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, नागपुरातील तब्बल १३ गावांनी करून दाखविले

vaccination
vaccinationvaccination

नागपूर : जिल्ह्यातील १३ गावांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमात (vaccination drive nagpur) रेकॉर्ड ब्रेक (nagpur sets record in vaccination) कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील अजून ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या ४८ टक्के नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. मात्र, १३ तालुक्यातील याच वयोगटातील सर्व नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. (all 45 plus people inoculated in 13 villages of nagpur)

vaccination
पाच महिन्यांत २६ हजार वाहनांवर कारवाई, लॉकडाउनमध्ये ४० लाख दंड वसूल

गावात तयार करण्यात आलेल्या चमुने नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत काही शंका तसेच गैरसमज असतील ते सर्व दूर केले. हे १३ गावे हे सहा तालुक्यातील असून सर्वाधिक गावे ही कामठी तालुक्यातील आहेत. यामध्ये गोंडीखापा, खापा, घुबडी, कवडीमेठ, मोहगाव (ढोले) या पाच गावांचा समावेश आहे. तसेच देवळी पेठ आणि टाकळघाट ही दोन गावे हिंगणा तालुक्यातील आहेत, तारणा आणि पौनी हे दोन कुही तालुक्यातील, परसोडी (दीक्षित) आणि रानवाडी ही दोन गावे नरखेड तालुक्यातील, कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव आणि सावनेर तालुक्यात सावळी (मोहतकर) या गावांचा समावेश आहे. या नागरिकांची संख्या एकूण १७०० आहे.

'आपल्या गावात लसीकरण' या संकल्पनेमुळे हे सर्व शक्य झाले. यासाठी ग्रामपंचायत, सरकारी प्रतिनिधी, अंगणवाडी सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींची मदत झाली. तसेच प्रत्येक गावामध्ये विशेष चमू तयार करून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले.

जिल्ह्याची लोकसंख्या ही ५२ लाख ७२ हजार ६६५ आहे. या सर्व लोकसंख्येच्या ३० टक्के लोक हे ४५ वर्ष वयोगटातील आहेत.तसेच राज्याच्या आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, याच वयोगटातील ८ लाख २२ हजार ७७५ म्हणजेच ५२ टक्के लोकांनी १० जूनला लशीचा पहिला डोस घेतला. उर्वरीत ७ लाख ५९ हजार २५ लोकांना अजूनही लस द्यायची बाकी आहे. नागपूर महापालिका आणि जिल्हा परिषद मिळून जवळपास २२१ लसीकरण केंद्र चालवत आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर ३०० लोकांना दररोज लस दिली जाते. त्यामुळे या केंद्राची क्षमता ही दिवसाला ६६, ३०० डोस देण्याची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत लसीकरणाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ही पाच हजाराच्या खाली आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com