
आकाशवाणीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून; सकाळच्या सभेत बदल
नागपूर : श्रोतेहो नमस्कार, मध्यम लहरी ३७८ अंश ७९२ हर्डझवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक सहा वाजले आहेत. बोचणाऱ्या थंडीत नागपूरकर कुडकुडत असताना चहा आणि त्यासोबत रेडिओवरील बातम्या तर हव्याच. ऐकूया दुपारच्या बातम्या... या अन् अशा आपलेसे करणाऱ्या उद्घोषणांमुळे आजवर स्थानिक केंद्र स्थानिक श्रोत्यांच्या आवडीनुसार प्रसारण करीत होते. मात्र, अशा उद्घोषणा कदाचित लुप्त होणार असून, उद्यापासून (ता. १) सकाळच्या सभेतील ११ वाजतापासूनच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण मुंबई केंद्रावरून (All India Radio from Mumbai Center) होणार आहे.
स्थानिक निवेदक, स्थानिक कलाकार, स्थानिक कार्यक्रम यातून शहराची आणि शहरातील कलाकारांची तसेच परिसराची माहिती घरबसल्या देणारी ही वेगवेगळी आकाशवाणी केंद्र प्रसार भारतीच्या अखत्यारीत येतात. राज्यातील नागपूर केंद्रासह पुणे, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, परभणी, सांगली आणि रत्नागिरी या आठ केंद्रांवर निर्णयाचा परिणाम होणार आहे. अप्पर महासंचालकांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. प्रत्येक केंद्राची स्वतंत्र ओळख ऐकत असताना असंख्य श्रोत्यांना वेगळा अनुभव येत असतो. या प्राथमिक केंद्रांवर अनेक वर्षांपासून हेच चित्र आहे.
हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळेंकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाइकाचा आरोप
प्रसार भारतीची धोरणे (Policies of Prasar Bharati) मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. ‘एक राज्य एक प्रायमरी चॅनल’ (A state is a primary channel) किंवा ‘एकच मुख्य वाहिनी’ असे धोरण आता प्रसारभारती अमलात आणत आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास केंद्रीकरण करीत ‘आकाशवाणी मुंबई केंद्र’ (All India Radio from Mumbai Center) या प्रमुख वाहिनीसह राज्यभरात प्रक्षेपित होणार आहे. यामुळे स्थानिक उद्घोषकांसह आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकामध्ये खदखद आहे.
स्थानिक कार्यक्रमांमध्ये आरोग्य, पर्यावरण किंवा शेतीविषयक कार्यक्रम, बालविभाग, संगीत विभाग, महिला विभाग असतात. यावर स्थानिक क्षेत्राची असणारी लकाकीसुद्धा या निर्णयामुळे पुसली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व निवेदकांपासून ते आकाशवाणीत विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बदलाला विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Web Title: All India Radio From Mumbai Center Changes In The Morning Meeting Policies Of Prasar Bharati A State Is A Primary Channel Nagpur News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..