चंद्रशेखर बावनकुळेंकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाइकाचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar Bavankule

चंद्रशेखर बावनकुळेंकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाइकाचा आरोप

नागपूर : भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) हे पाच हजार कोटींचे मालक आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा आहे. त्यांच्याकडे पाच फ्लॅट व चार महागड्या कार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी त्यांच्याच नातेवाइकांनी केली. सूरज तातोडे असे आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सूरज हे बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे आहेत.

ॲड. सतीश उके यांनी सोमवारी (ता. ३१) सूरज यांना नागपुरात आणून पत्रकार परिषद घेतली. चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना सूरज तातोडे (Suraj Tatode) हे नागपूर आणि मुंबईतील बंगल्यावर काम करीच होते. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सूरज यांच्याकडे देत होते. दोन वर्षांत अंदाजे शंभर कोटींचा काळा पैसा बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी ठेवायला दिला, असे तातोडे यांनी पत्रकारांना सांगितले. यामुळे नागपूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

हेही वाचा: मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

एसजी इन्फ्रा, केकेसी, सरस्वती कंट्रक्शन या कंपन्यांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी पैसे घेतल्याचा आरोपही तातोडे यांनी केला. काळ्या पैशातील हिशोबातील ३० लाख रुपये दिले नाही म्हणून मला कामावरून काढून टाकले. नावावर असलेले नागपुरातील पाच फ्लॅट, चार कार आणि एका कंपनीतील शेअर्स चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी जबरदस्तीने आपल्या नावावर केल्याचा आरोपही सूरज तातोडे यांनी केला.

सततच्या धमक्या आणि टेन्शनमुळे ब्रेन हॅमरेज झाला होता. यातून मी कसाबसा बचावलो. नैराश्याने खचल्याने ॲड. उके यांच्याकडे आल्याचे सूरज तातोडे यांनी सांगितले. ॲड. सतीश उके यांनी बावनकुळे हे आज पाच हजार कोटींचे मालक आहे. ज्याप्रमाणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करून गुन्हा दाखल होऊन खटला चालविला जात आहे. त्याचप्रकारे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांच्याविरोधात आरोप झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी ॲड. सतीश उके यांनी केली.

ॲड. उके याच्यात्याच्या माध्यमातून तीन वर्षांपासून त्रास देत आहे. हा शुद्ध ब्लॅकमेलींगचा प्रकार आहे.सूरज तातोडे हा माझा नातेवाईक आहे. काम नसल्याने त्याला रोजगार दिला होता. ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला असता उपचारही केले होते. त्याच्या डोक्यात काय फरक पडला असावा किंवा ॲड. सतीश उके यांनी त्याला भ्रमित केले हे तपासावे लागेल. आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
- चंद्रशेखर बावनकुळे, भाजप, आमदार

Web Title: Chandrasekhar Bavankule Bjp Leader Billions Of Black Money Allegation Of Relatives Nagpur News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top