

Religious Conversion Allegation Sparks Tension in Shirsgaon Kasba
sakal
शिरजगावकसबा : चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगावकसबा येथील पाच ते दहा वयोगटातील बालकांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी नेत असल्याचे कारण सांगून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून केला आहे. याप्रकरणात चौकशी करण्याचे निवेदन शिरसगावचे ठाणेदार महेंद्र गवई व सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांना देण्यात आले आहे.