Amravati Crime: तिघांनी घरात घुसून केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! मालमत्तेची तोडफोड करत दिली अपहरणाची धमकी

आई, भावास मारहाण करून अल्पवयीन मुलीची छेडखानी;दुचाकीची तोडफोड करून अपहरणाचा दिला इशारा
crime news
crime newsEsakal

Amravati Minor Girl Physical Assault: अल्पवयीन मुलीच्या (वय १७) घरात शिरून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आई व भावाने मध्यस्थी केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच पीडितेला अपहरण करण्याची धमकी देऊन दुचाकीची तोडफोड केली. वरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सलमान कासम शहा (वय २६), मोहंमद अमीन मोहंमद हारून (वय २६) व विशाल विजय कळसकर (वय २१), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित युवकांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना नमूद तिघांनी अचानक घरात शिरून तिला मारण्याची धमकी दिली.

त्यापैकी आधी दोघांनी पीडितेच्या भावाला व त्यानंतर आईस मारहाण केली. घरातून निघून जाताना त्यांनी दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. काही वेळेनंतर पीडित व भाऊ आपल्या नातेवाइकाकडे जात असताना पुन्हा तिघांनी धमकी दिली. (Latest Marathi News)

आपल्या विनयभंगासह दुचाकीची तोडफोड करून आई आणि भावास मारहाण केली, असा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने तक्रारीत केला आहे. त्याआधारे पोलिसांनी तिघाही संशयित युवकांविरुद्ध विनयभंग, मारहाण, तोडफोडीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

crime news
Uttarkashi Tunnel: सेफ्टी ऑडिट, बोगद्याच्या कामाला ब्रेक... उत्तरकाशी दुर्घटनेच्या सिल्क्यारा बोगद्याचं पुढे काय होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com