

भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या आई कमलाताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आलंय. अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं निमंत्रण कमलाताई गवई यांनी स्वीकारलंय. ५ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे. अमरावतीच्या किरण नगर परिसरातील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.