esakal | 'भाजप विरोधात बोलले तर ईडी अन् सीबीआय चौकशी लागतेय'
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh criticized bjp on ed inquiry

राज्यात वारंवार अनेक जणांना ईडीची नोटीस येत असल्याचे समोर आले आहे.  त्यावरून भाजप अन् महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आजच नागपुरात अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

'भाजप विरोधात बोलले तर ईडी अन् सीबीआय चौकशी लागतेय'

sakal_logo
By
संजय डाफ

नागपूर : ईडीचा अशाप्रकारे उपयोग करणे दुर्दैवी आहे. राज्यात अशाप्रकारचं राजकारण कधीही पाहण्यात आले नाही. भाजपच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी लावली जाते. मात्र, आता सीबीआयबाबत आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या परवानगीशिवाय सीबीआय राज्यात चौकशी करू शकत नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे...

राज्यात वारंवार अनेक जणांना ईडीची नोटीस येत असल्याचे समोर आले आहे. नुकतेच रविवारी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ही चौकशी असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही प्रताप सरनाई यांच्या मुलाची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावरून भाजप अन् महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आजच नागपुरात अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा - Video : तोट्याचा व्यवसाय समजली जाणारी शेती अशी ठरू...

ईडीच्या नोटीसमध्ये काहीही नवीन नाही - प्रफुल्ल पटेल
ईडीच्या नोटीसमध्ये काहीही नवीन नाही. भारतात अनेक लोकांना ईडीची नोटीस येतेय, हे आता इतकं स्वस्त झालंय, की याचं कुणालाही खराब वाटत नाही. आजकाल कुणालाही नोटीस बजावली जातेय. त्यांचा संबंध असोत किंवा नाही. ईडी नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर ते बाहेर येईल, यात राजकारण आहे का ते ही कळेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 
 
 

loading image