esakal | सीबीआय छापेमारीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बोलून बातमी शोधा

anil-deshmukh
सीबीआय छापेमारीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले...
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : सीबीआयची टीम आली होती. त्यांना आम्ही सहकार्य केलं. नागपूर जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट द्यायला काटोलला चाललो आहोत, अशी मोजकीच प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. आजच त्यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली. त्यानंतर जवळपास साडेदहा तासानंतर देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे. सीबीआयनं मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर येथील दहा ठिकाणी छापेमारी केली आहे. सीबीआयनं चौकशी केल्यानंतर दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

वाझे यांच्या मार्फत महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळं सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचलं होतं. न्यायालयानं याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार, सीबीआयन 15 दिवसानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी घर आणि मालमत्तांवर छापेमारी केली आहे.