Nagpur News : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृत्यूचा आलेख उतरता

वर्षभरात ६० जण ठार; दोन वर्षांच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी
animal leopard tiger bear attack death decreases vidarbha nagpur
animal leopard tiger bear attack death decreases vidarbha nagpuresakal

Nagpur News: राज्यात मानव -वन्यजीव संघर्ष वाढला असताना थोडा दिलासा देणारी बातमी आहे. कारण मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ६० जणांचा जीव गेला आहे. २०२२ या वर्षात सर्वाधिक १०९ बळी गेले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढत असताना विदर्भात वाघ-बिबटे व अन्य वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गावकरी दहशतीखाली वावरताना दिसतात. चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ३५ जणांचे बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहे.

शेतजमिनीचा विस्तार, विकासकामे, रस्ते रुंदीकरण, उद्योगांसाठी जमीन अधिग्रहण केल्याने जंगल क्षेत्र कमी झालेले आहेत. याशिवाय आता बिबट्याने आपले वास्तव्य शेतात हलविले आहे. यामुळेही मानव -वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे.

याशिवाय नागरी जीवन आणि पायाभूत सुविधांचा विकास करीत असताना वाघांसह वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा मुद्दा विचारात घेतला गेला नाही. त्यामुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागले आहेत. याशिवाय वाघांची संख्याही वाढू लागलेली आहे. वन्यजीव प्रेमींसाठी सुखद धक्का देणारी असताना रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे.

हत्ती आणि मानव संघर्ष वाढतोय

वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यजीवांच्या हल्ल्याच्याही धक्कादायक घटना अलीकडे घडल्या आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यात सातत्याने वाढ झालेली होती. यंदा मात्र, त्यात विक्रमी घट झालेली आहे. हे चांगले चित्र आहे.

यात सर्वाधिक १०९ बळी २०२२ मध्ये गेले होते. २०२१ या वर्षांत ८४ जणांचे बळी गेले होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानीपोटी कोट्यवधीचा निधी दिला गेला आहे. सर्वाधिक २४ मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यात झालेले आहेत.

त्यात सर्वाधिक २१ मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झालेले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ओडिशामधून विदर्भात हत्ती येऊ लागले आहेत. तेव्हापासून आता हत्ती आणि मानव संघर्ष वाढू लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा तीन जणांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com