
नंबरनिहाय कृत्रिम रेतन, जन्म, आजारपण, लसीकरण, दुग्धोत्पादन इत्यादींची नोंद ठेवता येते. याशिवाय बँकेत कर्ज घेण्यास मदत होईल. पशुसंगोपनासाठी शासकीय योजना असल्यास लाभ देणे सोयीचे होईल, अशी माहिती उमरेड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश राघोर्ते यांनी दिली.
Video : जनावरांना बिल्ला लावल्यास तातडीने मिळणार नुकसान भरपाई; हेही आहेत फायदे
उमरेड (जि. नागपूर) : ‘आपले पशुधन आपली तिजोरी, कानाला बिल्ला लावून नोंद करा शासन दरबारी’ या शीर्षकाखाली स्थानिक पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशू चिकित्सालय उमरेड यांच्यामार्फत शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील तसेच शहरातील दूध उत्पादकांच्या दुभत्या व अन्य लहान-मोठ्या जनावरांची नोंद करून घेत त्यांना आधारकार्ड लावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राघोर्ते यांच्या चमूने उमरेड शहरातील जनावरांना बिल्ले लावले. येणाऱ्या आधारकार्डबद्दल तसेच वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली. बिल्ला लावल्यामुळे नैसर्गिक आपत्तीत जनावरे दगावली असल्यास तातडीने नुकसानभरपाईची नोंद करण्यात येईल. तसेच बिल्ला लावल्याने जनावरांची खरेदी-विक्री करणे सोपे होईल.
क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार
बिल्ला नंबर असल्यास पशुपालकांना त्या जनावरांचा मालकी हक्क अधिकृत मिळतो. जनावरांची चोरी झाल्यास त्यांच्या मालकांना आपले जनावर ओळखण्यास मदत होते. नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांद्वारे होणारी शिकार, सदोष विद्युत प्रवाह अर्थात विजेच्या धक्क्याने जनावरांचा झालेला मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव देण्याचे सोयीचे होते.
नंबरनिहाय कृत्रिम रेतन, जन्म, आजारपण, लसीकरण, दुग्धोत्पादन इत्यादींची नोंद ठेवता येते. याशिवाय बँकेत कर्ज घेण्यास मदत होईल. पशुसंगोपनासाठी शासकीय योजना असल्यास लाभ देणे सोयीचे होईल, अशी माहिती उमरेड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश राघोर्ते यांनी दिली.
अधिक वाचा - पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रिंगणात होते दोन अभिजीत वंजारी; पात्र ठरले एकच
काम होणार सोपे
उमरेड शहरात दुभत्या जनावरांची संख्या हजारांच्या घरात आहे. तेव्हा वेळोवेळी त्यांना घटसर्प, खुरी तोंडी यासारख्या लशी लावण्यात येतात. हे काम सोपे होणार असल्याचे राघोर्ते यांनी सांगितले.
संपादन - नीलेश डाखोरे