Inventor : स्टडी टूरवर सूचली कल्पना अन् जन्म झाला ‘स्ट्रॉ’चा

Inventor : स्टडी टूरवर सूचली कल्पना अन् जन्म झाला ‘स्ट्रॉ’चा
Updated on

नागपूर : प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी (Damage to the environment due to plastics) होत आहे. यामुळे मधल्या काळात प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली होती. कोणीही प्लॅस्टिक पिशवीचा वापर करताना दिसल्यास पाच हजारांचा दंड आकारण्यात येत होता. तरीही प्लॅस्टिक पिशवीचा वापर होत असला तरी पर्याय म्हणून कागदी पिशव्या बाजारात आल्या. मात्र, स्ट्रॉचं (straw) काय? कारण, नारळ पाणी, कोलड्रिंग आदी पिण्यासाठी आजही प्लॅस्टिकच्या स्ट्रॉचाच वापर होतो. मात्र, आता याला पर्याय सापडला आहे. ‘प्लॅस्टिक स्ट्रॉ’ला पर्याय (Alternatives to plastic straws) शोधणाऱ्याचे नाव आहे श्रेयस नंदनवार (Shreyas Nandanwar)... (Architect-Shreyas-invented-the-wheat-and-bamboo-straw)

श्रेयस नंदनवार हा तरुण नागपूरचा रहिवासी आहे. आर्किटेक्‍टचे शिक्षण घेण्यासाठी तो गुजरातमध्ये गेला होता. त्याने अहमदाबादला ग्रामीण व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. काही बाबी दिसायला लहान असतात. परंतु, त्याचा व्यावसायिक व सामाजिक दृष्टिकोनातून विचार केल्यास नावीन्यपूर्ण व उपयोगी वस्तूंची निर्मिती शक्‍य होते. आर्किटेक्‍ट असलेल्या श्रेयसने प्लॅस्टिक स्ट्रॉ ऐवजी दुसरे काय वापरात येऊ शकते याचा विचार केला आणि त्यातून जन्म झाला बांबू आणि गव्हाच्या पिकापासून तयार केलेल्या स्ट्रॉचा.

Inventor : स्टडी टूरवर सूचली कल्पना अन् जन्म झाला ‘स्ट्रॉ’चा
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

श्रेयसने प्लॅस्टिकविषयीचा शोधप्रबंध निवडला होता. प्रबंध सादर केल्यानंतर शांत न बसता ‘प्लॅस्टिक स्ट्रॉ’ला पर्यायांचा विचार सुरू केला. बांबूचे स्ट्रॉ करता येईल, हे नक्की होते. त्याचसोबत गहू पिकाच्या अनुत्पादक भागापासूनही स्ट्रॉ करणे शक्‍य असल्याचे त्याच्या लक्षात आले. यासंदर्भात विविध तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांना भेटून मार्गदर्शन घेतले. यानंतर श्रेयसने बांबूसह गव्हाचे स्ट्रॉ बनवायचे नक्की केले.

कॉलेज टूरवर सूचली संकल्पना

श्रेयस कॉलेजच्या स्टडी टूरसाठी सिंगापूरला गेला होता. सिंगापूरहून तो व्हिएतनामला गेले. तेथे त्याने मित्रांसह ज्यूस व कॉफीचा आनंद घेतला. तेथे बांबूचे स्ट्रॉ वापरले जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. भारतात परतल्यावर कॉलेजच्या अधिष्ठातांना भेटून लाकडी स्ट्रॉची कल्पना सांगितली. अहमदाबादला काही मोठ्या रेस्टॉरंट मालकांसमोर त्याने ही कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली. त्यामुळे श्रेयसने गहू आणि बांबूच्या स्ट्रॉ निर्मितीस प्रारंभ केला.

Inventor : स्टडी टूरवर सूचली कल्पना अन् जन्म झाला ‘स्ट्रॉ’चा
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

प्लॅस्टिक बाजारपेठेचा केला अभ्यास

शिक्षण संपल्यानंतर श्रेयस नागपूरला परत आला. त्याने येथील प्लॅस्टिक बाजारपेठेचा अभ्यास केला. अनेक भागांत फिरून प्लॅस्टिक व्यावसायिक, हातगाडीवाले, नारळपाणी विकणारे, ज्यूस सेंटरवाले आदींना भेटून बांबू, गव्हाचे स्ट्रॉ वापरावे, असा सल्ला दिला. अनेकांना त्याची ही कल्पना आवडली. यासाठी त्याला ईशान्येतील काही मित्रांचेही सहकार्य लाभले. तेथूनच त्याने प्रथम असे स्ट्रॉ तयार केले आणि अहमदाबादला विक्री केली.

बांबू व गव्हाचे स्ट्रॉ पर्यावरणपूरक आहेत. उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले की, याच्या किमतीही कमी होतील. यामुळे नारळपाणी विक्रेत्यापासून ते पंचतारांकित हॉटेलमध्ये हे स्ट्रॉ सहजपणे उपलब्ध होतील.
- श्रेयस नंदनवार

(Architect-Shreyas-invented-the-wheat-and-bamboo-straw)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com