नागपूर शहराच्या सीमेवर सशस्त्र दरोडा

४५ मिनिटे लुटारूंचा हैदोस : महिलेच्या गळ्याला चाकू
robbery
robberysakal

नागपूर : काही महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या जोडप्याच्या घरात सात दरोडेखोर तलवार, चाकू आणि दोरखंडासह घुसले. महिलेच्या गळ्याला चाकू लावून त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि पैसे लुटले. त्यानंतर दरोडेखोरांनी घराच्या आवारातच दारू ढोसून हैदोस घातला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. तत्पूर्वी, या दरोडेखोरांनी बाजूलाच असलेल्या सीआरपीएफ जवानाचे घर देखील फोडले हे विशेष. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचभवन येथे पुनर्वसन केलेल्या परिसरात मंगेश देवराव वांद्रे हा कुटुंबासह राहतो. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला. मंगेश ट्रॅव्हल्सवर चालक आहे. पत्नी स्नेहा धंतोलीतील एका पतसंस्थेत नोकरी करते.

robbery
रेल्वे तिकीट काळा बाजार; ट्रॅव्हल संचालकासह एजंट अटकेत

पती-पत्नी झोपेत असताना रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी स्वयंपाक खोलीच्या दाराला छिद्र पाडून दाराची कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. दरोडेखोर चाकू, तलवार आणि शस्त्रासह थेट बेडरूममध्ये घुसले. एका दरोडेखोराचा स्टुलला धक्का लागल्याने औषधाची बाटली खाली पडल्याने स्नेहाला जाग आली. तिने डोळे उघडले असता सातजणांनी त्यांना घेरले होते. तोच दरोडेखोरांनी ‘ओरडू नका नाहीतर गळा चिरून ठार करू,’ अशी धमकी दिली. ‘तुमच्याकडे पाच तोळ्याचे दागिने आणि रोख ६ लाख रुपये असल्याची टीप आम्हाला मिळाली आहे. दागिने व पैसे देऊन टाका’ असे दरोडेखोरांनी दरडावून म्हटले. त्यावर स्नेहाने आमच्याकडे दागिने आणि पैसे नसल्याचे सांगितले. दोघांनी स्नेहा आणि मंगेशच्या गळ्याला चाकू लावला. त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. स्नेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी आणि अंगठी काढून घेतली.

robbery
औरंगाबाद : राज ठाकरेंनी मागितली माफी!

४५ मिनिटे हैदोस

दरोडेखोरांनी मंगेश आणि स्नेहाचे दागिने ओरबाडल्यानंतर पैशाबाबत विचारणा केली. दोघांनीही पैसे नसल्याचा पाढा वाचल्याने घरात शोधाशोध सुरू केली. ड्रेसिंग टेबलचे ड्रॉवर आणि कपाटात शोध घेतला. कपाटात साड्यांमध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबा दरोडेखोरांच्या हाती लागला. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने, रोख ३२ हजार रुपये आणि लॅपटॉप असा ८१ हजाराचा ऐवज लुटून नेला.

मोबाईल दिले फेकून

लूटमार केल्यानंतर बाहेर येताच सर्व दरोडेखोरांनी दारू ढोसली. वांद्रे यांच्या घराबाहेरच दारूची बाटली आणि ग्लास मिळून आले. बाहेरच दागिन्यांचा डबा फोडून दागिने काढून घेतले. दोघांचेही मोबाईल बाजूच्या झाडाझुडूपात फेकून दिले. त्यानंतर दरोडेखोर तेथून पळून गेले. दरोडेखोर निघून गेल्याचे लक्षात येताच वांद्रे दाम्पत्य समोरच राहणाऱ्या मधुकर सुरणकर यांच्या घरी गेले आणि त्यांना घटनेची माहिती दिली. सुरणकर यांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली.

robbery
विदेशातून नांदेडात १९४ प्रवाशी दाखल

पोलिसांच्या गस्त प्रणालीवर प्रश्‍नचिन्ह

दरोडेखोरांनी जवळपास दीड तास धिंगाणा घातला तरीही बेलतरोडी पोलिस वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे पोलिसांच्या गस्त प्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तत्पूर्वी दरोडेखोरांनी वांद्रे यांच्या शेजारी राहणारे कृष्णा हिवराळे या सीआरपीएफ जवानाचे घर फोडले. दरोडेखोरांनी दिवाण आणि कपाटातील सामान अस्तव्यस्त केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पाच पथके तयार केली.

पोलिसांना बनवले ‘मामा’

पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर बेलतरोडीचे पथक घटनास्थळाकडे निघाले. वांद्रे यांच्या घरापासून काही अंतरावर पल्सरवर दरोडेखोरांपैकी दोघे दिसले. त्यांना पोलिसांनी थांबवले आणि घटनास्थळ विचारले. ‘समोरून डावीकडे वळा’ असे सांगून ते घाईत निघाले. पोलिसांनी संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. दोघांनीही पावनभूमी येथे दुचाकी सोडून वायुसेनेची भिंत ओलांडून पळून गेले. ती पल्सरसुद्धा बाजूच्याच घरातून चोरल्याचे स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com